AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीसोबत लग्न झालं नाही म्हणून…; कंगना रनौतचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा

BJP Candidate Kangana Ranut on Rahul Gandhi Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात विविध नेते राजकीय बाबींवर विधानं करत आहेत. भाजपची उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौतने एक मोठं विधान केलं आहे. तिच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

प्रेयसीसोबत लग्न झालं नाही म्हणून...; कंगना रनौतचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
| Updated on: Apr 06, 2024 | 1:06 PM
Share

अभिनेत्री कंगना रनौत… कंगना एखादं वक्तव्य करते अन् त्याची बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातही चर्चा होते. एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने गांधी परिवाराबाबत एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे. परिस्थितीमुळे या दोघांना राजकारणात यावं लागलं, असं कंगना म्हणाली आहे. राहुल गांधी यांना त्यांच्या आईच्या सांगण्यावरून राजकारणात यावं लागलं, असं कंगना म्हणाली आहे. या शिवाय राहुल गांधी यांच्या वैयक्तिक जीवनावरही कंगनाने भाष्य केलं आहे.

राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिपण्णी

मी असं ऐकून आहे की, राहुल गांधी हे एका महिलेवर प्रेम करतात. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. राहुल गांधी यांना ना कौटुंबिक सुख मिळतंय. ना त्यांचं राजकीय करिअर चांगलं आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा दबाव आहे. त्यामुळे ते राजकारणात आहेत. बॉलिवूडमध्येही असे काही लोक आहेत. ज्यांना जबरदस्तीने अभिनय क्षेत्रात काम करायला लागत आहे. तशीच अवस्था राहुल आणि प्रियांका गांधी यांची आहे, असं कंगना म्हणाली .

राहुल गांधी हे महत्वकांक्षी आईचे पुत्र आहेत. ते परिस्थितीचे शिकार झाले आहेत. राजकारणाच्या पलिकडं ते खूप काहीतरी चांगलं करू शकत होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना राजकारणात यावं लागलं आहे. आईच्या दबावामुळे राहुल गांधी राजकारणात आले खरे, पण ते यशस्वी होत नाहीयेत, असं म्हणत कंगनाने सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे.

“प्रियांका-राहुल परिस्थितीचे शिकार”

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे परिस्थितीचे शिकार झाले आहेत. राहुल आणि प्रियांका हे दोघेही चांगली मुलं आहेत. पण त्यांच्या आई त्यांना त्रास देते. या दोघांचंही राजकारणात काहीही भविष्य नाही. आताही वेळ गेलेली नाही. या दोघांनी त्यांच्या आईने त्यांना काही चांगलं करू दिलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांना टॉर्चर नाही केलं पाहिजे, असं कंगना म्हणाली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.