Raosaheb Danve फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात; खडसेंचा चिमटा!

Raosaheb Danve फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात; खडसेंचा चिमटा!
रावसाहेब दानवे आणि एकनाथ खडसे.

शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत, पण पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली होती. आता खडसे यांनी दानवेंना टोला हाणत त्याच शब्दांत उत्तर दिले आहे.

रवी गोरे

| Edited By: मनोज कुलकर्णी

Mar 19, 2022 | 12:51 PM

जळगावः भारतीय जनता पक्षाचे (BJP) अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच महाविकास आघाडीला चिमटा काढतात. तुमचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हणतात. दोनच दिवसांपू्र्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावे. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी, पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शरद पवार यांनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत, पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, असा उल्लेख त्यांनी केला होता. आता खडसे यांनी दानवेंना टोला हाणत उत्तर दिले आहे.

चंद्रकांत दादांनी तारखा मागे घेतल्या…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या म्हणत त्यांनी पाटलांवर टीका केली. आता पाटील यावर काही बोलतात का, हे पाहावे लागेल.

दानवेंच्या नुसत्याच गप्पा…

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात आहेत. दानवे यांच्या फक्त मनोरंजनाच्या गप्पा सुरू आहेत. खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये, असा उल्लेखही त्यांनी केला. सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना अशी आरोप-प्रत्यारोपाची राळ उठतेय. आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा ठिणग्या पडतानाही दिसत आहेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें