APMC Election 2023 | एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचा सुपडा साप, चिमण आबांचा धुव्वा उडाला, सतीश अण्णांनी मैदान मारलं

चिमण आबांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयांवर धुळ्यातील जनतेचं नेमकं काय मत होतं याबाबतची उत्सुकता होती. अखेर आज पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालातून ते काहीसं स्पष्ट झालंय. बाजार समितीत अनेक वर्षांनी सत्तापालट झाली आहे.

APMC Election 2023 | एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचा सुपडा साप, चिमण आबांचा धुव्वा उडाला, सतीश अण्णांनी मैदान मारलं
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 7:40 PM

खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. खरंतर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. राजकारणात मोठा भूकंप घडून आला. त्यानंतरही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या दरम्यानच्या काळात अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडली. याशिवाय राज्यात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अर्थात हे संकेत कितपत खरे ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या राजकीय घाडमोडींवर नेमकं काय आहे हे समजण्यासाठी एक महत्त्वाची निवडणूक पार पडलीय. ही निवडणूक म्हणजे राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक.

पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी राज्यातील मोठ्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांमधून महाराष्ट्राचा नेमका मूड काय ते स्पष्ट होईल, असं मानलं जातंय. पण त्या निवडणुकांआधी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसलाय. जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यातही दोन दिग्गजांमध्ये लढत होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या 40 आमदारांमध्ये एरंडोलचे चिमणराव पाटील हे आमदारही होते. त्यावेळी चिमणराव पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. चिमणराव पाटील यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

चिमण आबा मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची चर्चा होती. पण मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन होऊन वर्ष होत आलं तरीही चिमण आबांना मंत्रिपद मिळालेलं नाही. चिमण आबांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर धुळ्यातील जनतेचं नेमकं काय मत होतं याबाबतची उत्सुकता होती. अखेर आज पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालातून ते काहीसं स्पष्ट झालंय.

नेमका निकाल काय?

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिमण आबांच्या गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. त्यांच्या गटाचे फक्त 3 सदस्य निवडून आले आहेत. चिमण आबांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. सतीश आण्णा यांच्यासाठी हे खूप मोठं यश आहे. खरंतर सतीश अण्णा आणि चिमण आबा यांच्यातील राजकीय संघर्ष हा नवा नाही. पण आज मैदान सतीश अण्णांनी मारलंय.

‘विधानसभेतील डिपॉझिट घालवल्याशिवाय राहणार नाही’, सतीश अण्णांचा निर्धार

सतीश आण्णांनी जिंकून आल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी चिमणराव पाटील आणि त्यांच्या मुलावर खोचक शब्दांत टीका केली. “आजचा विजय हा खऱ्या अर्थाने गर्वाने खोक्यांच्या माध्यमातून जो माज बाप आणि मुलाला आला होता त्याचं रुपांतर आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि प्रचंड जनसमुदायाने विजयात केलं आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून यांनी बाजार समिती हा भ्रष्टाचाराचा अड्डा मानला होता. शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम केलं. शेतकऱ्यांचं ज्वारी, बाजारी खरेदी केलं नाही. यांनी भ्रष्टाचाराचं राजकारण निर्माण केलं होतं”, अशी टीका सतीश पाटील यांनी केली.

“लोकांची प्रचंड नाराजी होती. ज्यादिवशी मी आणि माझ्या पत्नीने अर्ज रद्द केला होता त्याच दिवशी लोकांनी ठरवलं होतं की या बाप-बेट्याला धक्का देणार. आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणाने एकत्र आलो. ही विधानसभेची पूर्वतयारी आहे. आता त्यांची विधानसभेतील डिपॉझिट घालवल्याशिवाय राहणार नाही”, असा निर्धार सतीश पाटील यांनी यावेळी केला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.