सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जळगावात तब्येत बिघडली आहे.

सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 8:58 PM

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाब देखील कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर लगेच डॉक्टरांचं पथक त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झालंय. सुषमा अंधारे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीय. सुषमा अंधारे यांच्या भाषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेण्याचं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

सुषमा अंधारे सध्या जळगावात ठाण मांडून आहेत. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात सुरु असलेली महाप्रबोधन यात्रा जळगावात चांगलाच धुमाकूळ माजवत आहे. या सभेत त्यांची भाषणं प्रचंड गाजत आहेत. या भाषणांमधून त्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झालीय. पण त्यांच्या सभेला पोलिसांकडून मनाई करण्यात आली. कारण त्यांची सभा ज्या ठिकाणी होती त्याच परिसरात स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलाय.

हे सुद्धा वाचा

पण तरी सुषमा अंधारे या सभा घेण्यावर ठाम होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवलं होतं. सुषमा यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

अखेर तणाव वाढत असल्याने सुषमा यांनी मधला मार्ग काढत ऑनलाईन सभा घेण्याचं ठरवलं. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुषमा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.

या सगळ्या राजकीय गदारोळा दरम्यान सुषमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांची शुगर लेव्हल कमी झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल झाली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.