AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक… महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला हरवला कुठं? बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स

Mahayuti Legislative Council Seat Sharing Formula: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणूक जागा वाटपाचा तिढा अद्याप संपलेला नाही का? असा सवाल विचारल्या जात आहे. महायुतीतील नेते दोन जागांचा तिढा कायम असल्याचे म्हणत आहे. काय आहे मोठी अपडेट?

अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक... महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला हरवला कुठं? बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स
महायुती, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 29, 2026 | 11:17 AM
Share

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक मात्र जागा वाटपाचा फार्मूला अद्यापही ठरला नसल्याची मोठी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगावच काय पण महाराष्ट्रातला इतर कुठल्याही विधान परिषदेच्या जागेचा फार्मूला ठरला नसल्याचे मोठे वक्तव्य पाटील यांनी केले. जागा वाटपाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत.जलजीवन मिशनच्या निधी संदर्भात मी दिल्लीला गेलो होतो, यावेळी प्रमुख नेत्यांच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांना मी नव्हतो, अशी माहितीही गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे राज्यातील 17 विधान परिषद जागांवरून महायुतीत रस्सीखेच असल्याचे समोर येत आहे. जागा वाटपाचा पेच वाढल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल का? असा सवीाल केल्या जात आहे. त्यामुळे जागा वाटपाचा (Gulbrao Patil on Vidhan Parishad Election) सस्पेन्स वाढला आहे.

मैत्रीपूर्ण लढत होणार?

आम्ही कितीही काहीही म्हटलं तरी. अमर अकबर अँथनी (मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना उद्देशून) यांच्यावरच सर्व अवलंबून आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव विधान परिषदेच्या जागेचा सस्पेन्स कायम असल्याचे त्यामुळे समोर आले आहे. सुरुवातीला आमचं प्राधान्य महायुतीला असेल. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी जागा शिवसेनेला सुटली नाही तर पुन्हा मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.

मुलगा भाजपमध्ये जाणार?

विधानपरिषदेसाठी गुलाबराव पाटलांची चिरंजीवासह भाजपमध्ये जाण्याची चर्चा होत आहे. त्यावर त्यांनी मत व्यक्त केले. मी शिवसेनेचा मंत्री आहे. पूर्ण 45 वर्षे मी शिवसेनेमध्ये घातले आहेत. त्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दलच्या शंका उपस्थित करण देखील योग्य नाही. आमदार संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार यावरही त्यांनी मत व्यक्त केले. खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी कुणाला काय आणि संकेत द्यावे हा त्यांचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

दुधात पाम तेलाच्या भेसळीचा गंभीर प्रकार

अशा पद्धतीने दुधात भेसळ म्हणजे हे पाप आहे लहान बच्चू देखील ते दूध पितात. हे मोठे पाप आहे असे पाटील म्हणाले. यात कोणीही असेल त्याच्यावर कडक आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर प्रकरणावर बोलताना अतिशय जुने प्रकरण आहे याबद्दल मला पूर्ण काही माहिती नाही मात्र आता त्यांना कोर्टाने त्या प्रकरणात जामीन दिला आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल