विधानपरिषदेत शिवसेनेचा आणखी एक आमदार वाढणार?

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी ही आदर्श आचारसंहिता लागू असेल. आतापर्यंत या जागेवर काँग्रेसचे सुभाष झांबड आमदार होते. पण आता शिवसेनेचं पारडं जड दिसत असल्याने युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार असल्याचं चित्र आहे.

विधानपरिषदेत शिवसेनेचा आणखी एक आमदार वाढणार?
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 5:17 PM

औरंगाबाद : विधानसभेत शिवसेनेचा आणखी एक आमदार वाढण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी 19 जुलैपासून आचारसंहिता लागू झाली आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी ही आदर्श आचारसंहिता लागू असेल. आतापर्यंत या जागेवर काँग्रेसचे सुभाष झांबड आमदार होते. पण आता शिवसेनेचं पारडं जड दिसत असल्याने युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार असल्याचं चित्र आहे.

या जागेसाठी 1 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. 5 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहेत. 19 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 22 तारखेला या मतांची मोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 656 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात 17 मतदान केंद्र असणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9, तर जालना जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असतील.

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत सामीतीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतात. यापूर्वी काँग्रेसचे सुभाष झांबड हे या मतदारसंघातून आमदार होते. यावेळी शिवसेना-भाजपची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या जागेवर युतीचं पारडं जड आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेना या जागेसाठी कुणाला उमेदवारी देईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुभाष झांबड यांनीच निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

वरच्या सभागृहात युतीचं पारडं आणखी जड

विधानसभेसोबतच विधानपरिषदेचंही विधीमंडळात महत्त्वाचं स्थान आहे. विधानसभेने मंजूर केलेल्या कायद्यावर विधानपरिषदेतही चर्चा होते आणि विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी वरच्या सभागृहाचीही मंजुरी आवश्यक असते. सध्या शिवसेना आणि भाजपचे सदस्य विरोधकांपेक्षा जास्त आहेत. 78 सदस्यीय विधानपरिषदेत भाजपचे 23, शिवसेना 12 आणि रासपचा एक सदस्य आहे. तर युतीला पाठिंबा असणारे इतर 04 सदस्य असा हा आकडा 40 पर्यंत जातो. तर विरोधकांची संख्या 38 आहे. पण औरंगाबाद-जालना निवडणुकीनंतर युतीचा आणखी एक सदस्य वाढण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.