AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navnath Waghmare : जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर…मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज

Navnath Waghmare : या सगळ्यामागे मनोज जरांगे पाटील आहेत, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. "यापूर्वी त्यांनी अनेक मराठा तरुणांना असच फसवलं,हल्ले करायला लावून स्वतः अंतरवलीच्या बिळात जाऊन लपायच" असं नवनाथ वाघमारे म्हणाले.

Navnath Waghmare : जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर...मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज
Navnath Waghmare
| Updated on: Sep 22, 2025 | 1:55 PM
Share

गाडी जाळल्यामुळे ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जहरी टीका केली. नवनाथ वाघमारे यांच्या मते या घटनेसाठी मनोज जरांगे पाटील जबाबदार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनीच गाडी जाळली असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मनोज जरांगेची अवकात असेल तर त्याने स्वतः रस्त्यावर यावं असं नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं आहे. दुसऱ्याला समोर करून हे कृत्य करणं चुकीचं आहे. जरांगे पादरा प्राणी आहे असा बोचणारा टोला त्यांनी लगावला.

नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार काल एका अज्ञात व्यक्तीने जाळली. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती. एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन गाडीच्या जवळ आला.गाडीवर टाकलेल्या कव्हरवर त्याने आधी कॅनमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ टाकला त्यानंतर कार पेटवून दिली.

‘जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर घाबरणार नाहीत’

या सगळ्यामागे मनोज जरांगे पाटील आहेत, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. “यापूर्वी त्यांनी अनेक मराठा तरुणांना असच फसवलं,हल्ले करायला लावून स्वतः अंतरवलीच्या बिळात जाऊन लपायच” असं नवनाथ वाघमारे म्हणाले. “आम्ही खरं बोलतो म्हणून यांच्या बुडाला आग लागते. मी, शरद पवार, रोहित पवार राजेश टोपे या सर्व नेत्यावरती बोलल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली. जरांगेने जास्त माज दाखवला तर आम्ही जरांगेच्या गाड्या अडवू, जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर घाबरणार नाहीत” असा नवनाथ वाघमारे यांनी इशारा दिला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.