जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. तर, दुसरीकडे या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.  

Jalna Rain, जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

जालना : जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. तर, दुसरीकडे या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.

जालन्यातील अनेक गावांमध्ये आज मान्सूनने हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मात्र, या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे गावातील आणि शेतातील झाडे उन्मळून पडली. तर रस्त्यावरील विजेचे खांबही कोसळले. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील आणि शेतातील शेडवरील पत्रे उडून गेली. यामध्ये काही जण जखमीही झाले. तसेच, घराचे आणि घरगुती समानाचेही नुकसान झाले. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतिही जीवितहानी झालेली नाही. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव आणि पाणेवाडी परिसरात ही घटना घडली.

घनसावंगी तालुक्यातच वीज पडून दहा शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात चरायला गेलेल्या शेळ्यांना मेंढपाळाने एका झाडाखाली थांबवलं. मात्र, तिथे त्यांच्या त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये दहा शेळ्यांचा मृत्यू झाला.

मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला. जालना जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, शेलुद, सुरगळी, धावडा, जळगाव, सपकाळ, वालसावगी, आव्हाना, करजगाव, कल्याणी, भायडी, वरुडसह जिल्ह्यातील अनेक गावांत पाऊस झाला.

पहिलाच पाऊस जोरदार झाल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दोन दिवस पेरणी करता येणार नाही. गेल्या वर्षी एवढा पाऊस पूर्ण पावसाळ्यात झाला नव्हता. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *