AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाळू माफियांचा हैदोस, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न, थरार व्हिडीओत कैद

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा उदंडपणा वाढत असून, तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर अवैध वाळू उत्खननाच्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टरने हल्ला करण्यात आला. सुदैवाने तहसीलदार बचावले, पण ही घटना प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे.

वाळू माफियांचा हैदोस, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न, थरार व्हिडीओत कैद
jalna
| Updated on: Sep 11, 2025 | 10:36 AM
Share

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या वाळू माफियांनी त्यांच्या मुजोरीची हद्द पार केली आहे. नुकतंच जालन्यातील अंबडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. याप्रकरणी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (११ सप्टेंबर) भर दुपारी अंबड तालुक्यातील घोटण परिसरात दुधना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथक येत असल्याची कुणकुण वाळू माफियांना लागताच त्यांनी ट्रॅक्टरसह पळ काढण्यास सुरुवात केली.

यानंतर तहसीलदार विजय चव्हाण यांनी या वाळू माफियांचा तात्काळ पाठलाग सुरु केला. विजय चव्हाण यांनी साधारण पारनेर तांडा ते कर्जत असा ४० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. हा पाठलाग सुरू असतानाच एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाने वेग वाढवला. त्याने थेट तहसीलदार चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला जीवघेणा होता. मात्र ते त्यातून थोडक्यात बचावले.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कोणतेही भान नाही

सुदैवाने या दुर्घटनेत विजय चव्हाण यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. वाळू माफियांचा हा थरार पाहून स्थानिक गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी तहसीलदारांना मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महसूल पथकाला अखेर काही संशयितांना पकडण्यात यश आले. या घटनेनंतर वाळू माफियांची मुजोरी किती वाढली आहे, त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कोणतेही भान राहिलेले नाही, हे स्पष्ट होत आहे.

या घटनेनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या माफियांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी महसूल पथकाने ट्रॅक्टरसह अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.