AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब! जालन्याच्या छाप्यात एकूण 390 कोटी, 58 कोटींची कॅश, 32 किलो सोन्याचे दागिने, 16 कोटींचे हिरे-मोती, आयकर विभागाचे 260 अधिकारी, 120 गाड्या

आयकर विभागाच्या सुरुवातीच्या तपासात त्यांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. मात्र नंतर जालन्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका फार्महाऊसवर छापा घालण्यात आला. या फार्महाऊसमध्ये एका कपाटाच्या खाली, बेडमध्ये आणि इतर काही कपाटांमध्ये पैशांची बंडले सापडली.

अबब! जालन्याच्या छाप्यात एकूण 390 कोटी, 58 कोटींची कॅश, 32 किलो सोन्याचे दागिने, 16 कोटींचे हिरे-मोती, आयकर विभागाचे 260 अधिकारी, 120 गाड्या
पैसे मजून थकले अधिकारी, जालन्यात आठ दिवसांपासून इनकम टॅक्सची छापेमारी, 30 नव्या तिजोऱ्या उघडल्याImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 11, 2022 | 3:11 PM
Share

जालना- मराठवाड्यात जालन्यात (Jalna)आयकर विभागाने (Income tax raid) 5 व्यापारी समुहांवर मारलेल्या धाडीत 390 कोटींची (*390 crores)बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. या छाप्यात 58 कोटी रुपयांची कॅश, 32 किलो सोन्याचे दागिने, 16  कोटी रुपयांचे हिरे, मोती जप्त करण्यात आले आहेत. ही सगळी रोख रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाला तब्बल 13 तास लागले. काही कर्मचाऱ्यांची ही कॅश मोजताना तब्येत बिघडल्याचीही माहिती आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन स्टील कंपन्या, एक सहकारी बँक, एक फायनान्सर, एक डीलर यांची फॅक्टरी, घर आणि कार्यालय या सगळ्या ठिकाणी 1ते 7 ऑगस्ट अशी आठवडाभर ही कारवाई सुरु होती. याची माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. आयकर विभागाची टीम वराती म्हणून शहरात आले होते.

काय होता कोडवर्ड?

आयकर विभागांच्या गाड्यांवर लग्नांचे स्टीकर्स चिटकवण्यात आले होते. काही गाड्यांवर लिहलेले होते – दुल्हनिया हम ले जायेंगे, हाच या सगळ्यांचा कोडवर्ड होता. या कारवाईत आयकर विभागाचे 260अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते, सुमारे 120 गाड्या या सगळ्यांसाठी तैनात होत्या. हे सगळे ऑपरेशन पाच वेगवेगळ्या टीमने पार पाडले. यात मोठ्या प्रमाणात करचोरी करण्यात आल्याचा आयकर विभागाला संशय आहे.

35 मोठ्या पिशव्यांमध्ये नोटांची बंडले

आयकर विभागाच्या सुरुवातीच्या तपासात त्यांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. मात्र नंतर जालन्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका फार्महाऊसवर छापा घालण्यात आला. या फार्महाऊसमध्ये एका कपाटाच्या खाली, बेडमध्ये आणि इतर काही कपाटांमध्ये पैशांची बंडले सापडली. या सगळ्या नोटा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत जाऊन मोजण्यात आल्या. या मोजण्यासाठी 10 ते 12नोटा मोजण्याच्या मशीन होत्या. कपड्यांच्या मोठ्या 35 पिशव्यांत ही सगळी रक्कम आणण्यात आली होती.

गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगेचे होते स्टिकर्स

या छाप्याबाबत आयकर विभागाकडून मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यासाठी मोठी सावधगिरीही बाळगण्यात आली होती. टीमने आपआपल्या गाड्यांवर वर आणि वधुच्या नावांची स्टीकर्स लावली होती. यामुळे या गाड्या कोणत्यातरी लग्नाला निघाल्या असल्याचा भास निर्माण होत होता. या ऑपरेशनच्या काळात दुल्हनिया हम ले जायेंगे या कोडवर्डमध्ये सगळे एकमेकांशी संवाद साधत होते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?