भुजबळ यडपाट माणूस, त्या बुंगाऱ्याचं मला विचारू नका; मनोज जरांगेंचं शेलक्या शब्दात टीकास्त्र

| Updated on: Feb 03, 2024 | 11:10 AM

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : तू गोरगरीब ओबीसीचे वाटोळे करू नको, तुला प्रेमाने सांगतो...; जरांगेचा छगन भुजबळांना इशारा. जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय. येत्या सोमवारी मनोज जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत. या मागचं कारण काय? वाचा सविस्तर...

भुजबळ यडपाट माणूस, त्या बुंगाऱ्याचं मला विचारू नका; मनोज जरांगेंचं शेलक्या शब्दात टीकास्त्र
Manoj Jarange Patil
Follow us on

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवाली- सराटी, जालना | 03 फेब्रुवारी 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्या भुजबळचं, बुंगाऱ्याचं मला विचारू नका. त्यांचं बरोबर आहे. आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहेत, त्यांना स्थान नाही. थोड थांब आणि मी आणखीही सांगतो तू नादी लागू नको. तू गोरगरीब ओबीसीचे वाटोळे करू नको तुला प्रेमाने सांगतो. यांनी असं म्हणून म्हणून मराठे ओबीसी आरक्षणात गेले. पण ओबीसी बांधव त्यालाच म्हणत आहेत तू काय कामाचा आहे? आता ओबीसीत सर्व आता गेले आहेत आणि तुला बाहेर निघायची वेळ आली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळांवर निशाणा साधला

आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो. ओबीसीचे वाटोळे तू केले आहे. आम्ही ओबीसींचे वाटोळे होऊ देणार नाही. तू गप्प बस नाही टपकनवर जाशील. तुझे वय झाले आहे आणि या वयात एव्हडा लोड झेपत नाही. गप्प राहा, यडपाट माणूस आहे. कसे हे ओबीसीच्या हाताला लागले. ओबीसीचे वाटोळे करत आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.

जरांगेंचा भुजबळांना इशारा

मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी… तू माझ्या नादी लागू नको. तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असा इशारा जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.

सोमवारी पत्रकार परिषद

मला महत्वाचे सांगायचं आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जे समाजासमोर बोंबलत आहेत, की मराठा समाजाला मुंबईत गेल्यानंतर काय मिळाले हे स्पष्ट करणार आहे. या अगोदर समाजाला काय मिळालं हे सांगणार आहे. 70 वर्षात कोणी कोणी काय मिळु दिले नाही हे सांगणार आहे. आता मिळत आहे तर 75 वर्षात ज्यांनी मिळु दिले नाही आणि त्यांच्या पोटात का दुखत आहे हे सांगणार आहे. नेमकं सोशल मीडियात कोण बोलत आहे हे सांगणार आहे आणि हे का बोलतात हे ही समाजाला सांगणार आहे. असं मनोज जरांगे म्हणालेत.