AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ‘या’ बाबी जरूर लक्षात ठेवा

PM Kisan Samman Nidhi Yojana 16th Installment : शेतकऱ्यांसाठी काम की बात; पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 'या' बाबी जरूर लक्षात ठेवा. कसा घ्यायचा पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ? योजनेचा लाभ घेताना काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील. या योजनेबाबत सर्व माहिती वाचा एका क्लिवर...

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 'या' बाबी जरूर लक्षात ठेवा
| Updated on: Feb 03, 2024 | 12:10 PM
Share

मुंबई | 03 फेब्रुवारी 2024 : बळीराजा, जगाचा पोशिंदा… शेतकऱ्याच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून योजना आखल्या जातात. यातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना आखण्यात आली आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना… PM किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. दरवर्षी 6 हजार रूपये शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिले जात आहेत. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. मात्र त्यासाठी काही बाबी शेतकऱ्यांना लक्षात घ्याव्या लागतील.

कुठे रजिस्ट्रेशन कराल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातली सर्वात मोठी डीबीटी स्किम आहे. याचा लाभ देशातील करोडो शेतकऱ्यांना होतो आहे. या योजनेचा 16 वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीची शेतकरी वाट पाहात आहेत. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं लागेल.

या बाबी तपासा

आधारकार्ड आणि बँक अकाऊंट लिंक करा. जमीनीची योग्य कागदपत्र अपलोड करा. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपलं नाव रजिस्टर करा. eKYC आवश्य करा.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी योजना

केंद्र सरकारकडून चालवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना… या योजनेचा देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. देशातील छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. 24 डिसेंबर 2018 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी आणि शेतकऱ्यांची जीवनशैली सुधारावी, यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

कोणती कागदपत्रं आवश्यक?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेवटचा हप्ता हा नोव्हेंबर 2023 ला जमा झाला होता. आता यंदाचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. बँक अकाऊंट. पासपोस्टसाईज फोटो, आधारकार्ड, मोबाईल नंबर, खाते क्रमांक हे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कागदपत्राची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.