जालन्यातल्या 5 पैकी 4 नगर पंचायतींवर महिलाराज, तीन ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर, वाचा सविस्तर

जालना जिल्ह्यातील पाच पैकी 4 नगर पंचायतीवर महिला नगराअध्यक्ष झाल्या आहेत. काल अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

जालन्यातल्या  5 पैकी 4 नगर पंचायतींवर महिलाराज, तीन ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर, वाचा सविस्तर
जालन्यात पाच पैकी चार नगरपंचायतींवर महिला नगराध्यक्षांची निवड
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 9:39 AM

जालना | जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat Election) नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. पाच नागरपंचायती पैकी जाफराबाद, तिर्थपुरी, घनसावंगी या तीन नगरपंचायतीवर घड्याळाचा (NCP) गजर वाजलाय या तिन्ही नागरपंचायतीवर राष्ट्रवादीचे नागराध्यक्ष विराजमान झाले असून, बदनापूर नागरपंचायतिच्या नगर अध्यक्षपदी भाजपा (BJP) तर मंठा नागरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. पाच पैकी 4 नगर पंचायतीवर महिला नगराअध्यक्ष झाल्या आहेत. काल अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कार्यकर्ते आणि नेत्यांनी विजयी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. तसेच विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आणि नगरपंचायतींच्या समस्या सोडवण्याचे तसेच विकासकामे करण्याचे आश्वासन दिले.

5 पैकी 4 ठिकाणी महिला नगराध्यक्ष

जालन्यातल्या पाच नगरपंचायतींपैकी चार नगरपंचायतींवर अध्यक्षपदी महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. ती खालीलप्रमाणे-

मंठा- मीरा बोराडे ( शिवसेना ) बदनापूर – मंगल बारगजे ( भाजपा ) जाफराबाद – सुरेखा लहाने ( राष्ट्रवादी ) तिर्थपुरी – अलका चिमणे ( राष्ट्रवादी ) घनसावंगी- पांडुरंग कथले ( राष्ट्रवादी )

जाफराबादेत राष्ट्रवादीची सत्ता

जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शेख रऊफ शेख रहीम यांची निवड झाली. येथील निवडणुकीत काँग्रेस 06, राष्ट्रवादी 06, भाजप 01, अपक्ष 04 असे संख्याबळ होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे दोन सदस्य व एक अपक्ष सदस्यांचे समर्थन मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

बदनापुरात भाजपची सत्ता

बदनापूर नगरपंचायतीत भाजपच्या मंगल बारगजे तर उपाध्यक्षपदी शेख समीर यांची निवड झाली. या निवडणुकीत भाजपला 9, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 5 व अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या.

मंठ्यावर शिवसेनेचा भगवा

मंठा नगरपंचायत अध्यक्षपदी शिवसेनेच्या मीरा बाळासाहेब बोराडे तर उपाध्यक्षपदी इरमसबा रशीद खाटीक यांची बिनविरोध निवड झाली. या 17 सदस्य असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 12, काँग्रेसचे 2, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून आला.

तीर्थपुरी राष्ट्रवादीच्या ताब्यात

तीर्थपुरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचत्या अलका अण्णासाहेब चिमणे तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शैलेंद्र पवार यांची वर्णी लागली. या ठिकाणी भाजपला-2 शिवसेना-3, राष्ट्रवादी-11, काँग्रेस-1असे संख्याबळ आहे.

घनसावंगी नगरपंचायतीची स्थिती काय?

घनसावंगी नगरपंचायत निवडणुकीत अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे पांडुरंग कथले तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या शेख मुमताज शेख कासम यांची निवड करण्यात आली. इथे राष्ट्रवादीच्या ताब्यात 10 जागा तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत.

इतर बातम्या-

Bhandara Shiv Sena | पवनीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये मुंबईत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर दाखविला विश्वास

Sanjay Raut PC : पत्रकार परिषदेनंतर देसाई राऊतांना म्हणाले, ‘बास झालं, यापेक्षा जास्त बोलायचं नाय’; व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.