Manoj Jarange: कुठलीही नोटीस काढा, आता थांबणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारवर पलटवार
Manoj Jarange on Government: मुंबईच्या मोर्चापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले आहे. सरकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना हाताशी धरून मुद्दाम त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी कुठलीही नोटीस काढा, आता मागे न हटण्याचा इशारा दिला.

Manoj Jarange on Government: मुंबईतील मराठा मोर्चापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकाराला शिंगावर घेतले. काल त्यांनी सरकारवर टीका केली नव्हती. पण आज दुपारी त्यांनी सरकारविरोधात थेट मोर्चा उघडला. मुंबईत धडकणार असल्याने सरकार काही लोकांना हाताशी धरत कटकारस्थान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीची नोटीस येऊ की इतर कुठलीही नोटीस काढा, आता मागे न हटण्याचा इशारा त्यांनी दिला. तर सरकारचे मंत्री, त्यांचे पाठीराख यांच्या पाठीमागे लागणार असल्याचा खणखणीत इशाराही जरांगे यांनी दिला.
म्हणून माझ्याविरोधात कट
मी सरकारला नको आहे म्हणून माझ्या जवळच्या लोकांना त्रास सुरू केलाय. मला गोळ्या घालून मारायचं आहे. मुद्दाम हिंदूच्या सणवारात मुंबईत आला आणि SRPF तुकड्या घालून मला गोळ्या घालायच्या असा डाव शिजलाय. शिंदे आणि फडणवीस यांचा वर्षावर कट रचला आहे. मला गोळ्या झाडून मारायचा असा आरोप जरांगे यांनी केला. सामंत साहेबांनी तो शब्द वापरून दाखवला. मी मराठा एक केला म्हणून हे माझ्याविरोधात कट रचत आहेत. मोर्चा अर्ध्यात येऊ द्यायचा आणि मला पोलिसांकडून गोळ्या घालायच्या. मी समोर उभा राहतो पळून जात नाही, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्यावर्षीपासून सरकारला वेळ दिला
गणेशोत्सव असला तरी मागील वर्षी पण आम्ही गेलो होतो. सरकारला मागील वर्षांपासून वेळ दिला पण काय केले. आजपासून सरकारकडे आणखी 8 दिवस आहे. 2023 पासून संधी दिली पण सरकारला नासके पणा लागला, नीचपणा सुरू केला. जवळच्या लोकांना अडचणीत आणल्यावर आंदोलन थांबेल असे वाटते पण आंदोलन थांबणार नाही. शनिवार, रविवारी चौकशी करतात म्हणजे सरकार इतके ऍक्टिव्ह झाले असा रोकडा सवाल त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
धनगर मोर्चावेळी श्रीमंत धनगरांनी मदत केली नाही कां? बंजारा, आदिवासी मोर्चा झाला तेव्हा श्रीमंतांनी मदत केली नाही कां? निवडणूक लढताना तुम्ही कसं दारू पाजता, हाडकं खाऊ घालता तेव्हा मतं विकत घेता तेव्हा कसं चालतं. मला त्रास झाला तरी चालतंय. निवडून यायला शिंदे यांना मराठा आणि मनोज जरांगे लागतो. गद्दारी पुसून टाकण्यासाठी जरांगे आणि समाज लागतो. मग आता काय झाले. आम्ही शिंदे यांना मदत केली नसती ना तुम्ही आणि शिंदे राहिले नसते, अशी टीका जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
आम्ही असेही भिकारी आणि तसेही भिकारी आहोत. बनवकुळे यांचे खाते चौकशी लावता मग आम्ही पण सर्व जिल्ह्यात चौकश्या लावतो. त्यावेळी तुमच्या पाहुणे, कंत्राटदार यांची चौकशी लावतो ती नाही केली तर त्या ऑफिसला घेराव घालतो. माझी भाषा शिवराळ वाटते तर ती मागे घेतो पण मग आमच्या मागण्या मान्य करा असे जरांगे पाटील म्हणाले.