जे विमानात बसले नाही, त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं… शिंदेच्या खासदाराचं विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पाकिस्तानला गेले आहेत. त्यांनी राज्यातील काही नागरिकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी खास विमानाची सोय करुन दिली. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका खासदाराने यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य सरकारकडून परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पाकिस्तानला गेले आहेत. त्यांनी राज्यातील काही नागरिकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी खास विमानाची सोय करुन दिली. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका खासदाराने यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या नागरिकांबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानाने आणलं, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
“तुम्हाला माहिती आहे का त्या विमानात जवळपास ४५ लोक हे वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, जे रेल्वेने तिथे गेले होते. तिथे अतिशय वाईट परिस्थितीत होते. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. हे ४५ लोक आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते, त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केली. ते गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, जोर मिळाला, काम करण्याची स्फूर्ती वाढली. जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवाद म्हणता”, असे नरेश म्हस्के म्हणाले.
“४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये लँडक्रॅश झालं, तिथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये अडकले, गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं ती लोकं पहिल्यांदा विमानात बसतात. रेल्वेने गेलेली लोक आहेत. घाबरलेली लोक आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जात आहे”, असेही नरेश म्हस्केंनी म्हटले.
त्यासोबतच नरेश म्हस्केंनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे. यात त्यांनी एक कविता म्हटली आहे.
“संकट जिथे तिथे थेट जाऊन उभा ठाकतो तो, गढळलेल्या पाण्यामध्ये थेट पाय टाकतो तो. चर्चा बिर्चा करत नाही समित्या नको बैठका नको, फेसबुक लाईव्ह नको उंटावरून शेळ्या हाकणे नको . तिथे गरज ज्याची आहे ते घेऊन थेट पोहोचतो, म्हणून तर घर कोंबड्यांना तो कायमच बोचतो. इरशाळवाडी असो,असो कोल्हापूरचा पूर इथे जवळ असो वा काश्मिरात दूर, व्रत त्याचं अखंड आहे जनसेवेचा ध्यास आहे लोककल्याणाची बात आहे म्हणून तर तो ‘एकनाथ’ आहे… शिंदे साहेब तुमचे धैर्य निडरता संवेदनशीलता आणि समय सूचकतेला माझा सलाम” असे नरेश म्हस्केंनी म्हटले आहे.
