जनता कर्फ्यूच्या वेळेत वाढ, रस्त्यावर दिसल्यास कारवाई होणार

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी 19 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली (Janata curfew time increase)  होती.

जनता कर्फ्यूच्या वेळेत वाढ, रस्त्यावर दिसल्यास कारवाई होणार
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 6:21 PM

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी 19 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली (Janata curfew time increase)  होती. त्यानुसार आज (22 मार्च) सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला संपूर्ण देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. हा जनता कर्फ्यू आज सकाळी 7 ते 9 पर्यंत असणार आहे. पण या जनता कर्फ्यूच्या वेळेत आता वर्ध्यातील जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी वाढ केली आहे. हा जनता कर्फ्यू 9 ऐवजी आता उद्या (23 मार्च) सकाळी 5 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे, अशी माहिती विवेक भीमनवार यांनी दिली. त्याशिवाय उद्यापासून कुणी नागरीक विनाकारण रस्त्यावर दिसला तर त्याच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.

“जनता कर्फ्यूची वेळ सकाळी 5 केल्याने नागिरकांना बाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. जर कुणी विनाकारण बाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तूची दुकानं सुरु राहणार आहेत. ही दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार आहेत”, असेही विवेक भीमनवार यांनी सांगितले.

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहे. आज केंद्र सरकारने देशातील रेल्वे सेवा बंद केली आहे. त्यासोबत राज्य सरकारनेही मुंबईतील लोकल आणि एसटी, खासगी बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 31 मार्च पर्यंत सर्व कंपन्या, दुकानं आणि सार्वजनिक वाहतूक बंद राहणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता 74 झाली असून देशभारत 300 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा वाढत असल्यामुळे केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतेल जात आहे. कोरोना विषाणू तिसऱ्या स्टेजपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून सर्व लोकल ट्रेन, प्रिमिअम ट्रेन्स, मेल, एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर ट्रेन, कोकण रेल्वे, कोलकाता मेट्रो ट्रेन आज मध्यरात्री पासून बंद ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान, ज्या ट्रेन किंवा एक्सप्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरु राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येतील.

संबंधित बातम्या :

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.