AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला गरिबाला..’, भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया

जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

'मला गरिबाला..', भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया
_Jayant PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2025 | 6:50 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत, तसेच त्यांनी यावेळी माध्यमांना देखील सुनावलं आहे. तुम्ही माय बाप आहे, तुम्ही चालवलं तेच चालणार. मी इथेच आहे,  पक्षाचा मेळावा घेतोय. तुम्ही असं का करता मला माहीत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

भाजपा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला गरिबाला का सारखं वेठीस धरता. माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का? असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलता ते म्हणाले की, हे सर्व थांबवा.  तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बातमी चालवता मलाही प्रसिद्धी मिळते, माझीही कामं होतात असा खोचक टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर देखील प्रतिक्रिया दिली.   यावर्षी पूर येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूर येऊ नये यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाणी सोडलं पाहिजे आणि योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या भागातील लोकांनी जी मतं मांडले आहेत आंदोलनं केली आहेत सरकारने त्यांचं म्हणणं न ऐकता ज्यांनी आंदोलन केले नाही अशा लोकांना सरकारने बोलावले आहे. मात्र सरकारने  ज्यांनी आंदोलन केलं आहे, अशा लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजे, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते  वसंतदादांपर्यंत  या कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले, यावर मी बोलणार नाही, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.