कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होणार; के.सी. पाडवींची माहिती

कोरोना संसर्ग आणि उपायोजना लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होतील, अशी माहिती के. सी. पाडवी (K.C. Padvi) यांनी दिली.

  • जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार
  • Published On - 16:59 PM, 23 Nov 2020
K.C. Padvi reopening School

नंदुरबार : राज्यात सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आणि उपायोजना लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होतील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी (K.C. Padvi) यांनी दिली. ते नंदुरबारमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (K.C. Padvi on reopening of Ashram School)

“नंदुरबार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच, शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील,” असे पाडवी म्हणाले. तसेच, यावेळी शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (K.C. Padvi on reopening of Ashram School)

आधी अधिकाऱ्यांसोबत बैठक नंतर निर्णय

राज्यात बहुतांश जिल्ह्यांत इयत्ता नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे, शाळेत सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, शाळेचा परिसर वेळोवेळी सॅनिटाईझ करणे अशा प्रकारचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरु होतील. त्यासाठी योग्य ते सर्व नियोजन करावे लागेल. त्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्ट मत के. सी. पाडवी व्यक्त केले. त्यासाठी मंगळवारी (24 डिसेंबर) राज्यातील सर्व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांना त्या त्या परिसरातील कोरोना परिस्थिती विचारली जाईल. त्यानंतरच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही के. सी. पाडवी यांनी सांगितले. (K.C. Padvi on reopening of Ashram School)

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज : बच्चू कडू

दरम्यान शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत शाळा सुरु करण्याच्या ( school opening) निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी सोमवारी ( 22 नोव्हेंबर) व्यक्त केली होती. ते अमरावीत बोलत होते.

संबंधित बातम्या :

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!

उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?