AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaij News : तहसील कार्यालयात कुटुंबाचा अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न, जमीन मोजणीसाठी असहकार्य केल्याने संयम सुटला

या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच हंगामा झाला. कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने कुटुंबाला ताब्यात घेतले. पोलिसांनी या महिलांच्या हातून डिझेलच्या बाटल्या वेळीच हस्तगत केल्याने पुढील अनर्थ टळला.

Kaij News : तहसील कार्यालयात कुटुंबाचा अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न, जमीन मोजणीसाठी असहकार्य केल्याने संयम सुटला
Kaij News
| Updated on: Jan 13, 2026 | 8:28 PM
Share

प्रशासकीय दीरंगाईला कंटाळून केज तहसिलकार्यालयाच्या समोर एका कुटुंबातील चारजणांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जमीनीच्या मोजणीला महसूल अधिकाऱ्यांनी नकार देत खोडा घातल्याचा आरोप करीत संतापलेल्या लांडगे कुटुंबियाने हे टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या पोलिसांना वेळीच पाऊल उचलल्याने पुढील अनर्थ टळला. नेमका काय प्रकार पाहूयात

केज – बीड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडीलोपार्जित गायरान जमीनीतील क्षेत्रावर लांडगे कुटुंबाची वहिवाट आहे. मात्र, या जमिनीचा ताबा मिळवण्यात त्यांना कायदेशीर अडचणी येत आहेत. केज न्यायालयाने या जमीनीची मोजणी करुन त्याचे सीमांकन करण्याचा आदेश दिलेला होता. या आदेशाबरहुकूम तहसीलदारांनी १२ जानेवारीला भूमि अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचारी, मंडळाचे अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी हे जमीनीवर प्रत्यक्ष हजर राहून मोजणी करणार होते.

अधिकाऱ्यांचे असहकार्य आणि पाऊल उचलले

केज मोजणी कर्मचारी घटनास्थळी पोहचले, मात्र मंडळ अधिकाऱ्याने मोजणी प्रक्रियेत सहकार्य केले नाही आणि अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले लांडगे कुटुंब संयम सुटला. महसुल विभागाच्या दुर्लक्षामुळे लांडगे कुटुंबाने थेट तहसील कार्यालयाच्या चार सदस्यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. लांडगे कुटुंबातील सदस्यांनी अंगावर डिझेल ओतले आणि स्वत:ला आग लावल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि कर्मचाऱ्याने वेळीच त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.

प्रकरणाची पार्श्वभूमी

केज येथील विष्णू श्रीमंत लांडगे आणि त्यांच्या पाच भावडांना सर्व्हे क्र. ३०/१ आणि ३०/२ मधील प्रत्येकी ३२.४४ आर जमीन मा. दिवाणी न्यायालय (क- स्तर), केज येथील दिवाणी दावा क्र. ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनाम्यानुसार वाटप झाली आहे. या न्यायालयीन आदेशानुसार मिळालेल्या जमिनीची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात आली. वाटप तक्ता तयार करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने दि. १३ मार्च २०२५ रोजी केज येथील भूमि अभिलेख कार्यालयाला दिले होते.

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.