ठाकरे गटापुढे सर्वात मोठं संकट, 4 नगरसेवक गायब होताच थेट पोलीस…राजकारणात खळबळ!

कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे चार नगरसेवक गायब झाल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाने या नगरसेवकांचे पोस्टर लावल्याने आता या नगरसेवकांचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाले आहेत.

ठाकरे गटापुढे सर्वात मोठं संकट, 4 नगरसेवक गायब होताच थेट पोलीस...राजकारणात खळबळ!
kalyan dombivli election
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2026 | 8:28 PM

Kalyan Dombivali Municipal Election Result : राज्यात महानगरपालिकेची निवडणूक संपली असली तरीदेखील या निवडणुकीमुळे नगरसेवकांचा चालू झालेला घोडेबाजार अद्याप सुरूच आहे. आपल्याच पक्षाचा महापौर बासावा यासाठी त्या-त्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. इथे ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या नगरसेवकांबाबत रोज नवनवे खुलासे होते आहेत. ठाकरे गटाने कल्याण-डोंबिवली परिसरात नरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावल्यानंतर आता ठाकरे गटाविरोधात थेट तक्रार करण्यात आली आहे. नगरसेवकांचे हे प्रकरण आता थेट पोलिसांत गेले आहे.

नेमके काय घडले?

कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाचे 4 नगरसेवक बेपत्ता आहेत. आता कुटुंबीयही नॉट-रिचेबल असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच टीव्ही नाईन मराठीची टीम ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर ठाकरे गटाचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे आई-वडील व कुटुंबीयही आठवडाभरापासून घराबाहेर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती विनोद केणेही बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजताच आता नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाने लेखी तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर नगरसेवकांचे कुटुंबीय आक्रमक

ठाकरे गटाने पोलिसात जाऊन आमचे नगरसेवक गायब असल्याची तक्रार केल्यानंतर आता गायब असलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी आक्रमक होत थेट ठाकरे गटाविरोधातच तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आमचा मुलगा आमच्या संपर्कात असून त्यांचे हरवल्याचे पोस्टल लाऊन बदनामी केली जात आहे, असा आरोप मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी केला आहे. ठाकरे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात कोळसाळी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आता गायब असलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी ठाकरे गटाविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.