AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ढकललं… मग काठीने बेदम मारहाण; वर्दीतल्या पोलिसासोबत भयंकर घडलं, Video आला समोर

Kalyan Police Attack : कल्याण पश्चिम परिसरातील गौरीपाडा भागात एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याचे समोर आले आहे.

आधी ढकललं... मग काठीने बेदम मारहाण; वर्दीतल्या पोलिसासोबत भयंकर घडलं, Video आला समोर
Kalyan Police AttackImage Credit source: X
| Updated on: Jul 27, 2026 | 7:31 PM
Share

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील गौरीपाडा भागात एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गणेश चव्हाण असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर राहुल तायडे असं मारहाण करणाऱ्या मद्यधुंद तरूणाचे नाव आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसावर हल्ला करणारा हा आरोपी परिसरातील नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून गोंधळ घालत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी राहुल तायडे नावाच्या तरुणाने प्रथम त्यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर काठीने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

कानशि‍लातही लगावली

आरोपी राहुल तायडे गोधळ घालत असल्याने नागरिकांनी 112 वर कॉल करून तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण हे गेले होते. यावेळी आरोपी राहुल तायडे याने पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण यांची कॉलर पकडून कानशिलात मारत ठोसे-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसाचे डोके भिंतीवर आपटून लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चव्हाण यांनी हात आडवा केल्याने मोठी दुखापत टळली आहे.

आरोपीला अटक

या दोघांच्या झटापटीदरम्यान गणेश चव्हाण यांचा मोबाईल, नेमप्लेट आणि लॅनयार्डचे नुकसान झाले आहे. आरोपीने चाकू काढून पोलिसाच्या पोटावर वार करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत वार चुकवला. आरोपी हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपीविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी