नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, त्यांनी घरी बसून…

Kapil Patil on Uddhav Thackeray Narendra Modi Sabha For Loksabha Election 2024 : भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला कपिल पाटील उत्तर दिलं आहे. कपिल पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, त्यांनी घरी बसून...
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 1:25 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील, ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचार सभेसाठी आज जाहीर सभा होणार आहे. कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशात भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी घरी बसून उमेदवार जिंकून दाखवावं. मग तुम्ही रस्त्यावर का उतरला आहात? शरद पवारसुद्धा अडीच हजारांची सभा का घेत आहेत? पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला परिवार मानतात म्हणून ते जनतेत येत आहेत, असं म्हणत भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

आजच्या सभेवर भाष्य

आज कल्याणमध्ये नरेंद्र मोदींची सभा होत आहे. त्या सभेच्या नियोजनावरही कपिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. सभेचं नियोजन आपण बघत आहात. आजच्या सभेसाठी एक लाख लोक येतील. मोदींनी दिलेला संदेश हा गावागावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम जनता करेल. आजच्या सभेसाठी मोदी येणार मी आणि श्रीकांत शिंदे यांची तीन वेळेची हॅट्रिक आहे. यात मोदीजींची पण हॅट्रिक आहे… आता पुन्हा एकदा विजयाचे, महायुतीच्या महाविजयाचे हे संकेत आहेत, असं कपिल पाटलांनी म्हटलं.

महाविकास आघाडीवर निशाणा

आजच्या या सभेमधून जो संदेश दिला जाईल. तो गावागावात पोहोचेल आणि 20 तारखेला लोका आम्हाला बहुमताने निवडून देतील. आजच्या सभेला सर्वच महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. मोदींच्या येण्याने मागचे रेकॉर्ड आणि आता येणारा नवीन रेकॉर्ड… नरेंद्र मोदी रस्त्यावर का उतरले तुम्ही घरी बसा शरद पवारांना यावर देखील रस्त्यावर उतरायला लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही येता मग मोदीजींनी यायचं नाही का? असा सवाल कपिल पाटलांनी विरोधकांना केला आहे.

आमचा विजय हा महाविजय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराघरांमध्ये आणि मना मनामध्ये पोहोचले आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून विरोधक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी घरात बसून निवडून येऊन दाखवावं. मोदी 2014 पासून लोकांपर्यंत पोहोचत आहेत… यंदाही विजय हा महायुतीच असणार आहे, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज.
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक.
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.