पत्रीपुलाला अब्दुल कलाम यांचं नाव द्या; आजपासून वाहतुकीसाठी पूल सुरु

कल्याणमध्ये मेठ्या उत्साहात या पुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

पत्रीपुलाला अब्दुल कलाम यांचं नाव द्या; आजपासून वाहतुकीसाठी पूल सुरु

कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीकर ज्या क्षणाची प्रतिक्षा करत होते (Patri Pul Inauguration By CM). त्या पत्री पुलाचा उद्घाटन सोहळा अखेर पार पडला. कल्याणमध्ये मेठ्या उत्साहात या पुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उद्घाटव सोहळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदारही उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर कल्याणकरांसाठी ही पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल (Patri Pul Inauguration By CM).

भाजप खासदार कपिल पाटील –

यावेळी भाजप खासदार कपिल पाटील यांनी या पुलाला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी केली. “पत्री पूल बोलण्यास कसे तरी वाटत आहे. पत्री पुलाच्या या कामा मुळे अनेक त्रास सहन करावे लागले. मात्र अखेर काम पुर्ण झाले सर्वांचे आभार. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रेल्वेने वेळ दिला, त्यामुळे चांगले काम झाले. या पत्री पुलामुळे अर्धा-पाउण तास लागत होता. मात्र, हा पूल अजून 6 लेन झाला तर नक्कीच वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडी दूर होईल. या पुलाचे नाव डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावावर द्यावे, असं आम्ही निवेदन पत्र दिले आहे. आणखी काही नावे दिली असेल तर त्याचा देखील विचार करावे”, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –

“आपण असे काम करावे, की जनतेने नाव काढले पाहिजे. जनतेची कोणतीच तक्रार नको. तुम्ही सुचवलेले नाव देखील ठीक आहे. आपली युती होती ज्यावेळी आपण काम केले ते जनेतेसाठी आता देखील आम्ही जनतेसाठी कामे करणार. रेल्वे, MMRDA यांनी जे काम केले ते खरोखर चांगले काम केले आहे. मिठागरचे काम आहे. आणखी काही कामे आहेत. परंतु अडथळ्यांची शर्यत नको. जनतेच्या विश्वासाला तू-तू मै-मै होऊ नये.”

“असो आणखी कामे बाकी आहे. शीळ फाटा येथील काम लवकारात लवकर होईल अशी अपेक्षा आहे. मागील सरकार हे बोलची कडी आणि बोलाचा भात असे नव्हे. मला जनतेची तक्रार नको. जनतेच्या गर्दीमध्ये कॅमेरा फिरवा. मास्क कोणी कोणी घातले ते दाखवा. मी आज परवानगी दिली आहे. मास्क लावून ठेवा. आपण थोपवू शकलो ही नाही आणि संपवू शकलो नाही. कोव्हिड गेला नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे –

“हा पत्री पूल जुना होता, तो एक इतिहास होता आणि भविष्यात देखील इतिहास राहील. पुढील 100 वर्ष टिकेल असा पूल बनवला आहे. आई तिसाई देवी हे नाव महत्वाचे म्हणून आज पासूनच तिसाई देवी हे नाव देऊन जय घोष कर. भाजपच्या नाव देण्यावर शिवसेनेने या मंचावर दुसरे नाव सुचवले. पत्री पुल हा 2 वर्ष मध्ये संपवला आहे. कोण बोलतो उशिरा झाला, तसे नाही लवकरात लवकर आपण काम केले आहे. कोपरी पुलाआधी कल्याण पूलचे काम झाले. आपण हा पूल 8 ते 9 महिन्यात पुलाचे काम केले”, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले (Patri Pul Inauguration By CM).

पालकमंत्री एकनाथ शिंदे –

“एमएमआरडीए, रेल्वे यांचे आभार. 76 मीटर लांबीचा पूल केला आहे. दुसरा पूल 76 मीटर नसेल तो मोठा होईल. काहीजण समजत होते य़ा पुलाचे काम राखडणार. मात्र, तसे न होता काम पूर्ण झाले. काहींना तर असे वाटत होते काम कसे होणार. पुढील एका वर्षात अजून बाजूला एक पूल तयार करु. मतदार संघात अजून काही कामं सुरु आहे. इलिव्हटेट रोड असेल हा पूल 6 पदरी असतील असे अनेक काम येणाऱ्या काळात गती मिळून सुरु होणार. कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडी दूर होणार. राजकीय चर्चेला पूर्ण विराम मिळणार की नाही. मात्र, इंफास्ट्रक्चर संपणार नाही”, असा टोला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Patri Pul Inauguration By CM

संंबंधित बातम्या :

PHOTO | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, 25 जानेवारीला पत्री पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI