कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी दसरा, पत्री पुलाचं काम पूर्ण!

पत्री पुलाचं काम पूर्ण होणं हे कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी-दसरा सारखी आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी दसरा, पत्री पुलाचं काम पूर्ण!

कल्याण : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या अनेक काळापासून ज्या दिवसाची (Patri Pul Is Ready) वाट कल्याणवासी पाहात होते, त्या पत्री पुलाचे काम अखेर पूर्ण झालं आहे. पत्री पुलाचं काम पूर्ण होणं हे कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी-दसरा सारखी आहे. या पुलाच्या कामामुळे गेल्या 26 महिन्यांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आता या पुलाचं काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे (Patri Pul Is Ready).

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम
अखेर 26 महिन्यानंतर पूर्ण झाले आहे. येत्या सोमवारी 25 जानेवारीला सकाळी साडे बारा वाजता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नियोजनानुसार, शुक्रवारी ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे (Patri Pul Is Ready).

पत्रीपूल पाडण्यापासून ते नवीन पूल तयार होई पर्यंत काय-काय घडलं?

>> पत्रीपूल हा वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याने 18 नोव्हेंबर 2018 ला पाडण्यात आला

>> हा पूल ब्रिटीश कालीन होता

>> कल्याण रेल्वे मार्गावर हा पूल असल्याने कल्याण शीळ मार्गाला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता

>> 26 महिन्यांपासून काम सुरु

>> 25 नोव्हेंबर 2019 गर्डर टाकण्यात आला

>> नागरिकांना गेले 26 महिने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला

>> दोन-तीन तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकून राहायचे

>> पत्री पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी यासाठी नागरिकांनी आंदोलनंही केली

>> या पुलावरुन राजकारणंही रंगलं, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाल्या

>> अनेकदा मनसे, काँग्रेस, भाजपने या पुलासाठी आंदोलन केलं

>> खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पुलाचं काम पूर्णत्वास नेण्यासाटी अथक मेहनत घेतली

>> या पूलाचा कामात काही तांत्रिक अडचणीही आल्या

>> 26 महिन्यांनी अखेर हा पूल तयार झाला

Patri Pul Is Ready

संबंधित बातम्या :

अखेर पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यासाठी मुहूर्त मिळाला, 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक

पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI