AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपात प्रवेश करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याचा यु-टर्न, मध्यरात्री मोठी खलबतं, नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले महेश गायकवाड यांनी ऐनवेळी यू-टर्न घेत शिंदे गटात घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने ही घडामोड घडली.

भाजपात प्रवेश करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याचा यु-टर्न, मध्यरात्री मोठी खलबतं, नेमकं काय घडलं?
eknath shinde
| Updated on: Nov 09, 2025 | 11:12 AM
Share

कल्याण पूर्वच्या राजकारणात एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले महत्त्वाचे नेते महेश गायकवाड यांनी ऐनवेळी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यरात्रीच्या मोठ्या खलबतांमुळे ही घडामोड घडल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची संपर्कप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुन्हा राजकीय वजन प्राप्त

महेश गायकवाड यांचा शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातून सुरू झाला. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर, महेश गायकवाड यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाने तात्काळ त्यांची हकालपट्टी केली. ज्यामुळे महायुतीत स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला होता.या हकालपट्टीनंतर, महेश गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपली राजकीय ताकद कायम ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली.

महेश गायकवाड हे भाजपचे महत्त्वाचे नेते रवींद्र चव्हाण आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार होता. याची तयारीही पूर्ण झाली होती. भाजप प्रवेशाची तयारी अंतिम टप्प्यात असताना शिंदे गटाला डॅमेज होण्याचा धोका लक्षात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट मध्यरात्री महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आणि मनधरणी केली. केवळ घरवापसी नव्हे, तर महत्त्वाच्या संपर्कप्रमुखपदाची ऑफर दिली. संपर्कप्रमुख हे पक्ष संघटनेतील एक अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते, ज्यामुळे महेश गायकवाड यांना त्यांच्या मतदारसंघात पुन्हा राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

इन्कमिंगचा प्लॅन शेवटच्या क्षणी फेल ठरला

महेश गायकवाड यांच्या या निर्णयामुळे कल्याण पूर्व आणि उल्हासनगरच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. भाजपच्या हातातून एक ताकदवान ओबीसी चेहरा काढून घेत, शिंदे गटाने कल्याणमध्ये आपले संघटन आणि स्थानिक नेतृत्वावरील पकड मजबूत केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांचा इन्कमिंगचा प्लॅन शेवटच्या क्षणी फेल ठरला आहे. मात्र भाजपने नुकतेच दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला आव्हान दिले आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....