AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्टेशन बाॅम्बने उडवू, मध्यरात्री पोलिसांना फोनवरुन धमकी, पुढे काय घडलं?

कल्याण रेल्वे स्थानकावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा अज्ञात व्यक्तीचा फोन कॉल मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कल्याण स्थानकावर बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाड पाठवून तपासणी करण्यात आली. तीन ते चार तासांच्या ऑपरेशननंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

कल्याण रेल्वे स्टेशन बाॅम्बने उडवू, मध्यरात्री पोलिसांना फोनवरुन धमकी, पुढे काय घडलं?
Kalyan Bomb Threat
| Updated on: Dec 18, 2024 | 9:51 AM
Share

Kalyan Railway Station Bomb Threat : कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन पोलिसांनी ही धमकी दिली. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर पोलील आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत बॉम्बचा शोध घेतला. यामुळे रेल्वे स्थानकात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात एक फोन आला. यावेळी गणेश सर्जेराव मोरे हे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. त्यांनी तो फोन उचलला. यानंतर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरुन बोलतोय असे सांगितले. आम्ही कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे. आता लगेचच आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोनवरुन दिली. यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोठी धावपळ सुरु झाली.

त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. तब्बल तीन ते चार तास कल्याण स्थानकात सर्च ऑपरेशन करण्यात आहे. मात्र त्यानंतर फोनवरुन बॉम्बची अफवा देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना

या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. अशा धोकादायक अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही या आलेल्या कॉलचा तपास करत आहोत. यानंतर आता पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट