AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Rural Election Result 2024 LIVE Updates: कल्याण ग्रामीणमध्ये मोठा उलटफेर, मनसेचं इंजिन थांबलं, शिंदेंचं धनुष्यबाण सुसाट, कुणाला किती मतं?

Kalyan Rural MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. राजेश मोरे यांनी तब्बल 54,916 मतांनी मुसंडी मारत विजय खेचून आणला आहे. राजेश मोरे यांना 32 पैकी 23 व्या फेरीपर्यंत तब्बल 1,07,180 मते मिळाली आहेत.

Kalyan Rural Election Result 2024 LIVE Updates: कल्याण ग्रामीणमध्ये मोठा उलटफेर, मनसेचं इंजिन थांबलं, शिंदेंचं धनुष्यबाण सुसाट, कुणाला किती मतं?
| Updated on: Nov 23, 2024 | 3:27 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जागांपैकी कल्याण ग्रामीण मतदारसंघाची जागा आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तीन ताकदवान उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील जिंकून आले होते. राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार ठरले होते. राजू पाटील यांची गेल्या पाच वर्षात लोकप्रियता देखील वाढली आहे. राजू पाटील हे बेधडकपणे विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग मतदारसंघात आणि महाराष्ट्रात निर्माण झालाय. पण कल्याण ग्रामीणच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील तितक्याच ताकदीचे उमेदवार देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली.

कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुभाष भोईर हे 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आले होते. पण 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचं तिकीट कापून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना दिलं होतं. अटीतटीच्या लढतीत गेल्या निवडणुकीत राजू पाटलांचा विजय झाला होता. त्यानंतर कल्याण ग्रामीणच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी आपला हुकमी एक्का सुभाष भोईर यांना मैदानात उतरवलं. सुभाष भोईर यांना या निवडणुकीत सहानुभूतीचा मोठा फायदा होताना दिसला. मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत मशालची चर्चा सुरु होती. असं असलं तरी राजू पाटील यांच्याविषयी देखील तशीच चर्चा होती. तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्याबाबत चर्चा होती.

कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा निकाल काय?

कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. राजेश मोरे यांनी तब्बल 54,916 मतांनी मुसंडी मारत विजय खेचून आणला आहे. राजेश मोरे यांना 32 पैकी 23 व्या फेरीपर्यंत तब्बल 1,07,180 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचादेखील दारुण पराभव होताना दिसत आहे. राजू पाटील यांना मतमोजणीच्या 23 फेरीच्या अखेरपर्यंत केवळ 52,264 मते मिळाली आहेत. तर तिरंगी लढतीमधील ठाकरे गटाचे तिसरे उमेदवार सुभाष भोईर यांनाही फार कमी मते मिळाली आहेत. सुभाष भोईर यांना आतापर्यंत केवळ 49829 मते मिळाली आहेत. ते तीन नंबरचे उमेदवार ठरताना दिसत आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.