AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोर्डाच्या परीक्षेला उशीर झाला, नो टेन्शन…! विद्यार्थ्यांसाठी पोलिसांचा मोठा निर्णय

कल्याण-डोंबिवलीतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक पोलिसांनी 'ट्रॅफिक बाईक रायडर्स' ही विशेष सेवा सुरू केली आहे. वाहतूक कोंडीत अडकल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकतील.

बोर्डाच्या परीक्षेला उशीर झाला, नो टेन्शन...! विद्यार्थ्यांसाठी पोलिसांचा मोठा निर्णय
exam
| Edited By: | Updated on: Feb 10, 2026 | 3:15 PM
Share

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा. या काळात अभ्यासासोबतच वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे मोठे आव्हान विद्यार्थी आणि पालकांसमोर असते. कल्याण-डोंबिवली सारख्या गजबजलेल्या शहरात मेट्रोची कामे, उड्डाणपुलांचे बांधकाम आणि रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हीच अडचण ओळखून कल्याण वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

कोंडीवर मात, विद्यार्थ्यांची सोबत

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वाहतूक विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. शहरात ठिकठिकाणी १२ विशेष बाईक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. जर एखादा विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकला, तर हे रायडर्स त्याला तातडीने मदत करून सुरक्षितपणे आणि वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवतील. “वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढू नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे,” अशी भावना कल्याण वाहतूक शाखेचे एसपी किरण बालवडकर यांनी व्यक्त केली आहे.

जे विद्यार्थी किंवा पालकांनी वाहतूक कोंडीत अडकल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. फोन केल्यानंतर काही वेळातच जवळचा ट्रॅफिक रायडर मदतीला पोहोचेल. पोलिसांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षेचा ताण हलका होण्यास मोठी मदत होणार आहे.

  1. 8286300300
  2. 8286400400
  3. 7039003866

मुख्य रस्त्यांवरील पर्यायी मार्गांचा वापर करा

केवळ बाईक रायडर्सच नाही, तर परीक्षा केंद्रांच्या परिसरातील अनधिकृत पार्किंग आणि अडथळे दूर करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. पोलिसांनी पालकांना विनंती केली आहे की, परीक्षेच्या काळात किमान अर्धा तास आधी घरातून निघावे आणि मुख्य रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. खाकी वर्दीतील या संवेदनशील भूमिकेमुळे कल्याणकरांमध्ये पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडत असून, पालकांवरील परीक्षेचा ताण हलका होण्यास मोठी मदत होत आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?