कल्याणमध्ये तरुणीची छेड काढल्याने दोन गटात हाणामारी, पाच जण ताब्यात

डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रकरणी दोन्ही गटातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

कल्याणमध्ये तरुणीची छेड काढल्याने दोन गटात हाणामारी, पाच जण ताब्यात
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 4:34 PM

Kalyan Crime : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी भागात शुक्रवारी तरुणीची छेड काढल्याने दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सतत छेड काढून त्रास देणाऱ्या दोन तरुणांच्या घरी जाऊन तरुणीच्या कुटुंबियांनी जाब विचारला. यावरून रस्त्यावरच तरूणीचे नातेवाईक आणि आरोपी तरूणांचे कुटुंब यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले. या प्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रकरणी दोन्ही गटातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्वमधील पत्रीपूल भागातील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका पीडित तरुणीची सतत छेड काढून त्रास देत होते. गेल्या काही दिवसांपासून ही पीडित तरुणी घराबाहेर आली की आरोपी तिचा पाठलाग करून तिला त्रास द्यायचे. ही तरुणी त्या तरुणांना कोणताही प्रतिसाद देत नव्हती. पण ती घराबाहेर पडली की पाठलाग करायचे. ते तिचा मोबाईल नंबर मागत होते. मात्र तिने तो दिला नाही.

तरुणीच्या कुटुंबियासोबत जोरदार बाचाबाची

यानंतर सतत होणाऱ्या त्रासाला ती कंटाळली. यानंतर त्या पीडित तरुणीने घडलेला प्रकार शुक्रवारी घरी आई, वडिलांना सांगितला. यानंतर पीडित तरूणीचे आई, वडील आणि इतर कुटुंबीय याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी अरहम सय्यद याच्या घरी गेले. त्यावेळी अरहमच्या कुटुंबीयांनी तो असे काही करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियाना तेथून जाण्यास सांगितले. यावरुन जोरदार बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

पाच जण ताब्यात

या दोन्ही कुटुंबियांमधील सदस्य एकमेकांना भिडले. यामुळे भररस्त्यात जोरदार राडा झाला. हा वाद विकोपाला गेला आणि भर रस्त्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात चार जण जखमी झाले. या प्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर दोन्ही गटातील एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. जाकीर शेख, अरहम सय्यद अशी छेड काढणाऱ्या तरूणांची नावे आहेत.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....