गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांची युक्ती, फित न कापता गाड्यांचा ताफा पूलावर नेत लोकार्पण

कल्याणमध्ये 11 वर्षांपासून सुरु असलेल्या पूलाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला. (Kalyan Vadavali Bridge open by Minister Eknath Shinde).

गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांची युक्ती, फित न कापता गाड्यांचा ताफा पूलावर नेत लोकार्पण
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 8:38 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये 11 वर्षांपासून सुरु असलेल्या पूलाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला. गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी फित न कापता थेट आपली गाडी पूलावर नेत पूलाचे लोकार्पण केले. पूलाच्या लोकार्पणासाठी फित लावली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुलावर क्षणभर न थांबता त्यांच्या गाड्यांचा ताफा पूलावर नेला. त्यानंतर त्यांनी पूलाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी शहाड पूलाचे लोकार्पण केले (Kalyan Vadavali Bridge open by Minister Eknath Shinde).

स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती

कल्याणच्या वडवली पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज महापालिकेकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार कपील पाटील, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर हे देखील उपस्थित होते (Kalyan Vadavali Bridge open by Minister Eknath Shinde).

श्रेयाची लढाई, झेंडे लावण्यात चढाओढ

वडवली पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रम निमित्ताने शिवसेना-भाजपने संपूर्ण पूलावर त्यांचे झेंडे लावले होते. एकापोठापाठ एक शिवसेना-भाजपचे झेंडे फडकत होते. श्रेयासाठी एकही झेंडा कमी पडू नये, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली. 11 वर्षांपासून सुरु असलेल्या या पूलाचे लोकार्पण झाले. यासाठी दोन्ही पक्षाने काम केले होते. म्हणून दोघांनी झेंडे लावून त्यांचे श्रेय असल्याचे दाखवून दिले. मात्र, पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्याने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला.

पालकमंत्र्यांनी रस्त्यावरच चर्चा करुन काढला तोडगा

डोंबिवली आज महापालिकेने लादलेल्या निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी वडवली पूल येथे व्यापाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून दिली. यावेळी तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. दरम्यान भाजप खासदार कपील पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित होते. शहाड पूलावर चर्चा करुन रविवारच्या निर्बंधात शिथीलता आणली गेली आहे. उद्याचा निर्बंध व्यापारी सोमवारी पालन करतील, असे आयु्क्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

मनसे आमदारांची टीका

दरम्यान, या कार्यक्रमावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. “कोरोनामध्ये मेटाकुटीस आलेल्या व्यापारी आणि दुकानदारांना बंदी, यांची राजकीय दुकाने सर्रास जोरात चालू! अशाने कोरोना थांबणार आहे का? धन्य ते केडीएमसीचे आयुक्त आणि धन्य ते पालकमंत्री”, असं म्हणत राजू पाटलांनी हात जोडले आहेत.

हेही वाचा : सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री बंद, हॉटेलची पार्सल व्यवस्था सुरु, राज्यात काय सुरु काय बंद, नव्या नियमावलीत निर्बंध काय?

Non Stop LIVE Update
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.