AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करूणा शर्मा यांना मोठा झटका बसणार? धनंजय मुंडे यांच्या वकिलाचा आजवरचा सर्वात मोठा आरोप काय?

धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटणी देण्याचा निर्णय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी झालेल्या […]

करूणा शर्मा यांना मोठा झटका बसणार? धनंजय मुंडे यांच्या वकिलाचा आजवरचा सर्वात मोठा आरोप काय?
करूणा शर्मा
| Updated on: Apr 05, 2025 | 1:18 PM
Share

धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटणी देण्याचा निर्णय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेले नाही, असा दावा केला होता. आता आज याप्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली.

सध्या माझगाव कोर्टात करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे वकील युक्तीवाद करत आहे. करुणा शर्मा ह्यांच्याशी धनंजय मुंडे यांचे लग्नच झाले नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केला. करुणा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र वसियतनामा आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळे कागदपत्रे त्यांनी आणले आहेत. त्यांला काही अर्थ नाही, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत म्हणाल्या.

यानंतर कोर्टाने तुमचा युक्तिवाद संपला असेल तर ऑर्डर देईन, असे म्हटले. यानंतर करुणा शर्मा यांच्या वकिलाने युक्तीवाद करण्यास सुरुवात केली. आम्ही सादर करत असलेले पुरावे हेदेखील महत्वाचे आहेत, असे करुणा मुंडे यांचे वकील म्हणाले.

आम्ही आधीच कागदपत्रे दिलेली आहेत ज्यात करून मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. वसियतनामा मध्ये जो उल्लेख आहेत, त्यावरून करुणा मुंडे त्यांच्या पत्नी आहेत हे सिध्द होत नाही. वसियतनामामध्ये जे काही खोट नमूद करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात करुणा मुंडे यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांनी डॉक्युमेंट खोटे बनवले आहेत आणि त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत. करुणा मुंडे फक्त धनंजय मुंडे यांच्या सोबत काही काळ होत्या. त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटले.

खालच्या कोर्टात ही कागदपत्रे सबमिट

यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मोठा आरोप केला आहे. करुणा शर्मा यांनी कागदपत्रे बनावट बनवली आहेत. त्यावर आम्ही तक्रार केली आहे. खालच्या कोर्टात ही कागदपत्रे सबमिट केली, तेव्हा आम्हाला कळल, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंतांनी म्हटले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा