AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी; करुणा शर्मा यांच्या आरोपाने खळबळ

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. करुणा शर्मा यांनी आंधळेचा खून झाला असण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी वाल्मिक कराडकडून झालेल्या मारहाणीचाही आरोप केला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी; करुणा शर्मा यांच्या आरोपाने खळबळ
संतोष देशमुख हत्याप्रकरणात करुणा शर्मा यांचा खळबळजनक आरोप
| Updated on: Feb 07, 2025 | 11:49 AM
Share

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तो कुठे आहे? त्याचं काय झालं? याची काहीच माहिती लागत नाहीये. 50 दिवसाहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी आणि सीआयडी अपयशी ठरली आहे. त्यातच आता करुणा शर्मा यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

करूणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक दावा केला आहे. वाल्मिक कराडने मला मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्यासमोरच मला मारहाण केली. माझ्या शरीराला त्याने कुठे कुठे हात लावला. तीन वर्षापूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तिथेच हा प्रकार घडला होता. याबाबतचे मी सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी कार्यालयाला मागितले. पण मला ते अद्यापही देण्यात आलेले नाही, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यावरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंचे आर्थिक घोटाळे बाहेर काढेन…

कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे. त्याची हत्या देखील झाली असावी . वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. वाल्मिकचे बँकेत 100 खाती आहेत. त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला असेल. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक आर्थिक गडबडीची माहिती आहे. वेळ आली तर मी सगळी माहिती बाहेर काढेन, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

त्यांची नार्को टेस्ट करा

दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आका आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नार्कोटेस्ट करण्याची मी मागणी केली आहे. कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून आता अशोक मोहिते प्रकरणातील दोघेजण कर्नाटकमध्ये पकडले आहेत. ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. म्हणजे आक्का आणि त्यांच्या गॅंगचा माज अजूनही संपलेला नाही. अजूनही अशोक मोहिते शुद्धीत नाहीत. या प्रकरणात कलम वाढ करायला हवी, अशी मागणी करतानाच कृष्णा आंधळे लवकरच सापडेल, असं सुरेश धस यांनी सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.