AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाची कामे नकोच… सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ते दुरुस्तीसाठी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद राहील. वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येईल. अवजड वाहनांना पूर्ण बंदी आहे. प्रवाशांनी प्रवास आखणी करावी. मदतीसाठी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम उपलब्ध असतील.

महत्त्वाची कामे नकोच... सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?
पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद असेल
| Updated on: Feb 24, 2025 | 9:41 AM
Share

महत्त्वाच्या कामासाठी कसारा घाटातून जाणार असाल तर ही बातमी ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-नाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून येत्या सहा दिवसात या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवार, 24 फेब्रुवारी ते गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागणार आहे.

अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी

दरम्यान, जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. जव्हार, मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. या दिशेने प्रवास करणार असाल तर वाहनचालक, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळे वळविण्यात येणारी मार्ग लक्षात घेता मुंबई – नाशिक – शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे. नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारली जाणार आहेत.

जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात यांचा त्रास होणार नाही, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्यांकडून करण्यात येत आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन