
विनायक डावरूंग, सुनील जाधव, प्रतिनिधी : राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजीही व्यक्त केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी ऐनवेळी पक्षांतर करत अर्ज दाखल केला. तर काही उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी या जवळपास बिनविरोध झाल्या आहेत. 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्या कागदपत्र पडताळणी होणार असून त्यानंतर विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र रेखा चौधरी यांची विजय निश्चित मानला जात आहे.
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीआघीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड धाली आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय आहे अशी भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
रेखा राजन चौधरी या भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आता कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने खाते उघडले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आता 31 तारखेला कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे.