AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : सतत फोनवर व्यस्त असायची सिया, ओठांवर फक्त बॉयफ्रेंडचं नाव, केतनला संशय येताच… FIR मध्ये मोठी गुपितं उघड

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल मर्डर केस प्रकरणात धक्कादायक सत्य आता समोर येत आहेत. केतन याला सिया हिच्या वागणुकीवर संशय देखील आलेला. केतनच्या वडिलांनी FIR मध्ये उघड केली अनेत गुपितं...

Ketan Agarwal Murder Case : सतत फोनवर व्यस्त असायची सिया, ओठांवर फक्त बॉयफ्रेंडचं नाव, केतनला संशय येताच... FIR मध्ये मोठी गुपितं उघड
| Updated on: Jun 24, 2026 | 12:40 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या मृत्यूनंतर धक्कादायक सत्य समोर येत आहे. केतन याच्या निधनानंतर वडील देवीचंद अग्रवाल यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत अनेक हैराण करणारे दावे केले आहेत. दाखल तक्रारीनुसार, सिया आणि केतन कायम एकमेकांना भेटायचे आणि फिरायला जायचे. पण हळू – हळू सिया हिच्या वागणुकीत केतन याला बदल जाणवू लागलेला. केतन याने कुटुंबियांना देखील सांगितलेलं की, सिया छोट्या – छोट्या गोष्टींवर वाद करु लागलेली आणि सतत केतन याच्यावर लोहगड जाण्यासाठी दबाव टाकायची. एवढंच नाही तर, कुटुंबियांनी असा दावा देखील केला आहे की, 31 मे आणि 14 जून रोजी देखील दोघे लोहगड येथे गेलेले. तरी देखील सिया हिला लोहगड येथेच जायचं असायचं…

एफआयआरनुसार, केतन अग्रवाल आणि सिया प्रवीण गोयल यांचा साखरपुडा फेब्रुवारी 2026 मध्ये पुण्यातील एका हॉटेलमध्ये पार पडला होता; हे स्थळ नातेवाईकांमार्फत निश्चित करण्यात आलं होतं. तक्रारीत नमूद केल्यानुसार, साखरपुड्यानंतर हे दोघे वारंवार भेटायचे, तरीही या काळात केतनने सियाबद्दल आपल्या कुटुंबीयांकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती. तिची पार्श्वभूमी नीट तपासली गेली होती का, असा प्रश्न त्याने उपस्थित केल्याचं म्हटलं जातं आहे. सिया ओळखीच्या नातेवाईकांमार्फत संपर्कात आली होती, असं सांगून कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली होती.

एआयआरनुसार, केतन कायम कुटुंबियांना सिया हिच्या वागणुकीबद्दल सांगायचा. सियाचा फोन कायम व्यस्त असतो आणि तिच्या ओठांवर फक्त आणि फक्त चेतन चौधरी नावाच्या एका व्यक्तीचं नाव असतं. याशिवाय ती सतत केतन याला लोहगड येथे येण्यास सांगायची. सिया हिचा हट्ट कुटुंबियांसाठी देखील सामान्य होता. कारण ती सतत केतन याच्याकडे तसा हट्ट करायची.

घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच 17 जून रोजी, सियाने केतनला फोन करून 18 जूनला असलेल्या तिच्या वाढदिवसाचे निमित्त लोहगडला जाण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला केतनच्या आईचा यासाठी विरोध होता; मात्र, तक्रारीनुसार सियाने आपला आग्रह कायम ठेवल्यामुळे अखेरीस कुटुंबाने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8.20 वाजता केतन घरातून बाहेर पडला, पुणे-मुंबई महामार्गावरील किवळे पुलाजवळ सियाला भेटला आणि लोहगडच्या दिशेने निघाला.

एफआयआरनुसार, सकाळी पावणेअकराच्या सुमारास सियाच्या आईने केतनच्या कुटुंबीयांना कळवलं की, तो लोहगड किल्ल्यावरील दरीत पडला आहे. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले होते. नंतर डॉक्टरांनी केतनला मृत घोषित केलं. सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले गेलं, परंतु काही बाबींमुळे कुटुंबीयांच्या मनात शंका निर्माण झाली.

चौकशीदरम्यान पोलीस कशाची तपासणी करत आहेत?

पोलीस सध्या मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन हिस्ट्री आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. घटनेच्या दिवशी घटनास्थळी कोण उपस्थित होतं आणि आरोपींमधील परस्पर संपर्काचे स्वरूप काय होतं, हे शोधण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. या तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!