AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : केतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टी, कुटुंब आणि… सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

पुण्यातील केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. लग्न टाळण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून दिले, असा आरोप आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. कुटुंबाकडून न्यायाची मागणी होत असतानाच, सोशल मीडियावर केतन आनंदाने नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांचे दुःख अधिकच गडद झाले आहे.

Ketan Agarwal Murder : केतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टी, कुटुंब आणि... सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल
केतनचा व्हिडीओ समोरImage Credit source: social media
| Updated on: Jul 01, 2026 | 10:43 AM
Share

चार महिन्यांपूर्वी मुलाचा झालेला साखरपुडा आणि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं लग्न.. लग्नासाठी उत्साहात जय्यत तयारी सुरू होती. मात्र 18 जूनचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. होणाऱ्या सुनेसह लोहगडावर गेलेला आपला मुलगा, केतन परत येणार नाही याची कोणीही कल्पना देखील केली नव्हती, मात्र लोहगडावरून पडून केतनचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू मावळलं आणि शोकाकूल कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

पुण्यातील व्यावासायिक केतन अग्रवाल हत्येने सगळेच हादरले असून याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. केतनशी लग्न करायचं नव्हतं यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचे सियाने सांगितलं. 18 जून रोजी वाढदिवसाच्या सेलिब्रिशेनच्या निमित्ताने सिया ही केतनला लोहगडावर घेऊन गेली. आधी ठरल्याप्रमाणेच तिचा मित्र चेतनही तिथे आला होता. आणि संधी साधून, कोणी आजूबाजूला नाही हे पाहून त्यांनी केतनला खाली ढकललं. 400 फूट खोल दरीत कोसळल्यामुळेच चेतनाच मृत्यू झाला.

याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सिया व चेतनचीही सतत चौकशी सुरू असून हत्येचे मोटिव्ह, त्यांनी प्लान कुठे कसा रचला, याची सर्व माहिती पोलिस शोधत आहेत. सीन रिक्रिएशनसाठी आधी सियाला आणि आज ( बुधवार 1 जुलै) चेतनलाही लोहगडावर नेलं होतं.

चेतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टीत कुटुंबियांसह हसत केला डान्स यय

याच दरम्यान आता मृत केतन अग्रवाल याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर आला असून तो व्हायरल झाला आहे. केतन आणि सियाच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडीओ समोर आलेत. 7 मे रोजी एक कौटुंबिक कार्यक्रम पार पडला, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे आई-वडील, तसेच होणारे सासू-सासरे (सियाचे आई-वडील) आणि कुटुंबीय हे सगळेच गाण्यावर ठेका धरत, आनंदाने नाचताना दिसत आहे. अग्रवाल कुटुंबीय आणि केतन याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याची हत्या करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

केतनला सियाबद्दल होता संशय ?

सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं नमूद केलं होतं की, केतनने अनेकदा सिया आणि चेतनच्या जवळीकीबद्दल चिंता व्यक्त केली होती.सिया नेहमी बोलताना चेतनचे नाव घेते, असं ही तो म्हणाला होता. केतन जेव्हा तिला फोना करायाच सियाचा फोन नेहमी बिझी असायाच. तिच्या वागण्यामुळे त्याला संशय आला होता. मात्र आपण तिची नीट चौकशी केली आहे, असं अग्रवाल कुटुंबियांनी केतनला सांगत आश्वस्त केलं होतं.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...