AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : तुला नाही जमणार, आता मीच… केतनला मारण्याचा प्लान 3 वेळा फेल, सियावर भडकला चेतन

Ketan Agrawal Death Case : लोहागड किल्ल्यावरील केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी एक मोठी बाब समोर आली आहे. सियाने केतनला संपवण्याचा तीनदा प्रयत्न केला होता, परंतु तिला त्यात यश आले नाही. पण 18 जूनला अखेर केतनचा मृत्यू झाला.

Ketan Agarwal Murder : तुला नाही जमणार, आता मीच... केतनला मारण्याचा प्लान 3 वेळा फेल, सियावर भडकला चेतन
केतनला संपवल्याच सिया - चेतनला काहीही पश्चाताप नाही
| Updated on: Jun 26, 2026 | 11:11 AM
Share

लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे कारस्थान उघडकीस आलं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार केतनचा मृत्यू ही अपघाती घटना नव्हे, तर तो पूर्वनियोजित आणि अत्यंत अचूकपणे आखलेला हत्येचा कट होता. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन यांनी केतनचा जीव घेण्याचे केवळ एक-दोन नव्हे, तर अनेकदा अयशस्वी प्रयत्न

जीव घेण्याचा प्लान वेळा फेल आणि..

तपासातून असे निष्पन्न झाले आहे की, केतनच्या हत्येचा कट काही आठवडे आधीच रचण्यात आला होता.

पहिला प्रयत्न (31 मे) : सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले. एका निर्जन ठिकाणी केतनला खाली ढकलून तो ‘अपघात’ असल्याचे भासवण्याचा बेत होता, पण सियाला तसं करण्याचं धाडस झालं नाही.

दुसरा प्रयत्न (4 जून) : 1 जून रोजी एक नवीन ‘अचूक’ योजना आखण्यात आली, परंतु 4 जून रोजीही या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

तिसरा प्रयत्न (14 जून) : सिया आणि केतन पुन्हा एकदा लोहगड किल्ल्यावर गेले. सियाने त्याला ढकलणं अपेक्षित होते, पण तो वाचला आणि धैर्य खचले आणि हा प्रयत्नही फसला. साप आल्याच सियाने केतनसमोर भासवलं होतं.

बाली ट्रिप आणि पासपोर्ट फ्लश

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि केतन यांनी 6 जून रोजी बालीला जाण्याचा प्लान आखला होता. मात्र, केतनचा या सहलीला तीव्र विरोध होता आणि त्यावरून तो सियावर दबाव टाकत होता. तपासादरम्यान असे समोर आले की, मुंबई विमानतळाकडे जात असताना सियाने आपला मोबाईल फोन गाडीतच राहिल्याचं नाटक केलं; त्यानंतर ती वॉशरूममध्ये गेली आणि तिथे तिने केतनचा पासपोर्ट फाडून तो टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकल्याचा आरोप आहे. पासपोर्ट गहाळ झाल्यामुळे त्यांची बालीची ट्रीप रद्द करावी लागली, ज्यामुळे केतनला संशय आला आणि त्या दोघांमधील वाद वाढत गेले.

तुला जमणार नाही, आता केतनला मीच संपवेन

केतनला संपवण्यात सलग तीन वेळा अपयश आल्यानंतर चेतनचा संयम सुटला. 14 जून रोजीचा प्लानही फेल झाल्यावर, चेतनने सियाला कथितरीत्या सांगितले, “आता 18 तारखेसाठी नवीन योजना आहे. केतनचा जीव मीच घेईन; हे काम तुला जमणार नाही.”

18 जूनला अखेर मृत्यू

पोलिसांच्या तपासानुसार, ज्या दिवशी तो भयंकर कट अंमलात आणला गेला, त्याच दिवशी – म्हणजेच 18 जून रोजी – चेतनने पहिल्यांदाच लोहगड किल्ल्याला एकट्याने भेट दिली होती. हत्येनंतर पोलिसांच्या मागापासून वाचण्यासाठी त्याने मुद्दाम आपला कर्मचारी नीरज कुमार याचा मोबाईल फोन वापरला. 18 जून या संपूर्ण दिवसादरम्यान सिया आणि चेतन चॅट मेसेजद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते; हे मेसेजेस आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरले आहेत.

18 जूनचा दिवसच का निवडला ?

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जून रोजू सियाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी केतन तिला महाबळेश्वरला घेऊन जाणार होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत असं होऊ नये अशी चेतनची इच्छा होती, त्यामुळेच हत्येसाठी 18 जूनची तारीख निश्चित करण्यात आली.

ना खेद, ना खंत, काहीच पश्चाताप नाही, सिया-चेतनचे एकमेकांवर आरोप

चौकशीदरम्यान सियाने कबूल केलं की तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं आणि हेच या संपूर्ण वादाचे मूळ कारण ठरलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या चौकशीत दोन्ही आरोपींनी स्पष्टपणे सांगितले की, केतनच्या मृत्यूबाबत त्यांना कोणताही पश्चाताप वाटत नाही. मात्र, आता दोघेही एकमेकांवर केतनाला धक्का दिल्याचा आरोप करत आहेत. चेतनचा दावा आहे की सियाने त्याला धक्का दिला, तर सिया म्हणत्ये की, चेतननेच लोहगडावरून केतनला धक्का दिला होता. सध्या पोलीस डिजिटल पुरावे आणि कॉल तपशीलांच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?