AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : खरातला उत्तेजक औषधांचं अतिसेवन भोवलं, दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका, तरीही सुटेना वासना

अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली, ज्यामुळे त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित झाली. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असताना, हे धक्कादायक वैद्यकीय सत्य समोर आले आहे.

Ashok Kharat : खरातला उत्तेजक औषधांचं अतिसेवन भोवलं, दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका, तरीही सुटेना वासना
भोंदू अशोक खरात
| Updated on: Mar 27, 2026 | 8:49 AM
Share

अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱा, या घाणेरड्या कृत्यांचं रेकॉर्डिंग करणारा भोंदू खरात सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिस कोठडीत असलेल्य खरातचे एकेक हादरवणारे कारनामे समोर येत असून त्याने फक्त महिलांचं शोषण केलेलं नाही, तर अनेकांची आर्थिक फसवणूक करत लुबाडलं, गैरप्रकार करत कोटयवधींची संपत्तीही जमवल्याचं उघड झालं आहे. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत असून य़ाप्रकरणात वेगाने तपास सुरू आहे.

याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. महिलांचे लैंगिक शोषण करणारा, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खरातची प्रकृती उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे बिघडली होती. त्याला अर्धांगवायूचा झटाक आला. त्यावेळी त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्याच एका डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते. मात्र या झटक्याचा त्याच्याशरीरावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आलं. भोंदू खरात याच्या एका हाताची हालचाल आजही मर्यादित आहे. तसेच त्याच्या भुवईवरही परिणा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येतंय. शक्तीवर्धक, उत्तेजक औषधं घेणं खरातच्या जीवावर बेतलं होतं. याप्रकरणी तपासातून अधिक महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

खरातच्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द

दरम्यान भोंदू बाबा अशोक खरातच्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने लायसन रद्द करण्याची ही कारवाई केली आहे. खरात याला 2012 साली लायसन्स देण्यात आलं, तर 2024 साली त्याचं पुन्हा नूतनीकरण करण्यात आलं. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून नराधम खरातचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.

उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचही केलं शोषण 

एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने  जाळ्यात ओढले होतं अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.  पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  दोन्ही महिलांची भोंदू बाबा कडून आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याची माहिती सूत्रांची दिली असून  दोन्ही महिलांकडून खरात विरोधात तक्रार केलं जाणार असल्याचंही समजतं.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'