AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट! पत्नीमुळे मुरलीधर…. चांदगुडे कुटुंबियांचा खुलासा

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेनंतर मुरलीधर चांदगुडे यांच्यावर अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज आपल्या मुलाच्या आठवणींना उजाळा देताना वयोवृद्ध असलेल्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट! पत्नीमुळे मुरलीधर.... चांदगुडे कुटुंबियांचा खुलासा
Khavdya Dongar CaseImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 12:52 PM
Share

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. मुरलीधर चांदगुडे हे राहणार मूळचे अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केल्यानंतर ते संभाजीनगरला राहण्यासाठी गेले आणि ट्रक चालवून त्यांचा उदरनिर्वाह करू लागले होते. एकूणच या सगळ्या आठवणी सांगताना वयोवृद्ध असलेल्या आपल्या आई-वडिलांचे आणि बहिणींचे डोळे पाणावले होते. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या सगळ्या कुटुंबाशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला.

आई-वडिल नेमकं काय म्हणाले?

खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेनंतर मुरलीधर चांदगुडे यांच्यावर अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज आपल्या मुलाच्या आठवणींना उजाळा देताना वयोवृद्ध असलेल्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. इतकंच नव्हे तर टीव्ही नाईन मराठी शी बोलताना त्यांच्या आई ढसा ढसा रडल्या. पत्नीमुळे मुरलीधर गावाकडे येत नव्हता आणि माझी शेवटची भेट 15 दिवसापूर्वी झाली होती. तेव्हा तो गावाकडे आल्यानंतर त्याने झाडून घेतल्याच आईने सांगितलं. मुलगा पंधरा दिवसांपूर्वीच… आई-वडिलांचे प्रेम आपल्या लेकरावर किती असतं हे सांगण्यासाठी शब्दाची गरज नसते. मात्र चांदगुडे परिवाराच्या बाबतीत हे प्रेम अक्षरशः जिवापलीकडे गेलं.

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा समावेश आहे. १८ वर्षीय कुणालच्या हट्टामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. मुलाचा फक्त पाय मोडला असंच आम्हाला शेजारीपाजारी सांगत होते मूळ घटना कोणीही सांगितली नाही असे मुरलीधर यांच्या आई-वडिलांनी सांगितले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालच्या आजोळी सतत वाद सुरु होते. 20 वर्षांपूर्वी मूरलीधर यांनी स्वत:च्या मर्जीने लग्न केले आणि लग्न करताना आई-वडिलांना देखील सांगितले नव्हते. त्यामुळे चांदगुडे कुटुंबात वाद सुरु झाले होते. त्यानंतर मूरलीधर यांनी जमिनीच्या काही मोजकाच हिस्सा बहिणींना दिला होता. या सगळ्यामुळे कुणालदेखील नैराश्यामध्ये गेला होता.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा