AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: आधीच एक मुलगा गमावला, आता कुणाल…; चांदगुडे कुटुंबाबाबत मोठी माहिती समोर

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कुणालच्या एका लहान भावाचे देखील निधन झाले होते. याबाबत कुणालच्या आईने स्वत: माहिती दिली होती.

Khavdya Dongar Case: आधीच एक मुलगा गमावला, आता कुणाल...; चांदगुडे कुटुंबाबाबत मोठी माहिती समोर
Khavdya Donger Case Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 1:09 PM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. आता या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. संगीता यांचे स्वत:चे एक यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर त्यांनी आधीच एका मुलाला गमावल्याचे म्हटले आहे. आता त्या मुलाचे निधन कसे झाले वाचा…

वादाचा नवा पैलू समोर आला

अहवालांनुसार संगीता सोशल मीडियावर व्हिडिओही बनवत असे. तिच्या एका व्हिडिओमध्ये तिने कौटुंबिक वादाचा उल्लेख केला होता. तिने म्हटले होते की, एका तिसऱ्या महिलेच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात वाद निर्माण होत होता. तिने आपल्या पती मुरलीधर चांदगुडे आणि त्या महिलेसोबत गोष्ट सांगितली होती. यामुळे कुटुंबात तणाव वाढल्याचा उल्लेख तिने व्हिडिओमध्ये केला होता. मात्र या वादाचा अलीकडच्या घटनेशी काही संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या सर्व गोष्टी तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता .

एका मुलाचा झाला होता मृत्यू

कुणालची आई संगीताने तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये संगीताने सांगितले की, काही लोक तिच्या पतीला त्रास देत आहेत. तिने वैवाहिक जीवनातील अडचणींबद्दल खुलासे केले होते. शिवाय तिने सांगितले की, आठ वर्षांपूर्वी तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंब धक्क्यात होते. त्या घटनेनंतर कुटुंबातील तणाव कमी झाला नाही. रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वाद होतच राहत होता.

संपूर्ण प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय कुणाल आपल्या वडील मुरलीधर यांच्याकडून आयफोन न दिल्याबद्दल नाराज होता. त्याने ईएमआयवर आयफोन विकत घेतला, तेव्हा हप्ता भरण्याबाबत वाद सुरू झाला. मुरलीधर ड्रायव्हर होते. शुक्रवारी सकाळी कुणाल आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला. त्यानंतर आई-वडील, आसपासचे लोक आणि पोलिस त्याला रोखण्यासाठी पोहोचले. डोंगराच्या खाली जाळेही टाकण्यात आले, पण तो जागा बदलत गेला. वडिलांनी हिंमत करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतुलन बिघडले आणि दोघे खाली पडले. त्यानंतर संगीतानेही डोंगरावरुन उडी मारली.

Follow Us
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर