Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!

2 ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार, किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करणार, असा इशारा काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना ईडीकडे तक्रार कशी करायची असते, याची माहिती सांगत त्यांची खिल्ली उडवली.

Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!
राहुल झोरी

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Feb 21, 2022 | 1:41 PM

मुंबईः संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आज किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी संजय राऊत यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोमय्या यांनी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचं खंडन करायला मी तयार आहे. मी आजवर कोणत्याही पुराव्यांशिवाय बोललेलो नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 2 ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार, किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करणार, असा इशारा काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना ईडीकडे (ED) तक्रार कशी करायची असते, याची माहिती सांगत त्यांची खिल्ली उडवली.

संजय राऊत यांचे काय होते आरोप?

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे दलाल असून त्यांनी ईडीच्या नावावर अनेकांकडून पैसे उकळ्याचा आरोप केला होत. यासाठी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचेही ते म्हटले होते. तसेच माझ्याकडे किरीट सोमय्या यांच्याविरोधात शेकडो वसुलीच्या तक्रारी आल्या असून हे सर्व कागदपत्र घेऊन मी दिल्लीला रवाना होणार आहे. हे दोन ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

किरीट सोमय्यांनी घेतली शाळा

संजय राऊत यांनी ईडीकडे जाण्याचा इशारा दिला. यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, 2 ट्रक पेपर घेऊन जाणार म्हणतात, काय सेन्सेशन करता? 7500 कोटी अमित शहा, फडणवीस यांना दिले काय म्हणता? ईडीकडे तक्रार करण्याची काय पद्धत आहे माहिती आहे का? राज्य सरकारने तक्रार रजिस्टर करायची असते. मग ईडीकडे जायचं असतं. पोलिसांनी याआधी कचरा वाटला म्हणून तक्रार केली नाही ना? असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना विचारला. तसंच संजय राऊत हे रोज नवे आरोप करत असले तरीही किरीट सोमय्या रोज उत्तर देणार नाही, जनतेला पाहिजे तेव्हा देणार. मी आजवर एकही गोष्ट कादगपत्राशिवाय बोललेलो नाही. आज रश्मी उद्धव ठाकरेंची 2 पत्र दिलंय, उद्धव ठाकरेंना अन्वय नाईकला लबाड म्हणायचं का? अन्वय नाईक जागा दिली बंगले नव्हते, मग अन्वय नाईकने चिटींग केलं? असे असंख्य प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.

इतर बातम्या-

राणेंच्या बंगल्यावर पालिका पहिल्यांदा गेलेली नाही, केंद्रानं सांगितलंय CRZ चं उल्लंघन झालंय, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें