Sanjay Raut In ED Custody: अब संजय राऊत की बारी है… 20 जुलै रोजी किरीट सोमय्यांचे ट्विट; 11 व्या दिवशी म्हणजे 31 जुलैला संजय राऊत ED च्या ताब्यात

गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी (Goregaon Patrachal Land Scam) किरीट सोमय्या यांनी पाठ पुरावा केला होता. यानंतर ईडीने सोमय्या यांना चौकशीसाठी बोलावले होते. तसे समन्सही ईडीने राऊतांना बजावले होते. मात्र, पावसाळी अधिवेशनासाठी राऊत दिल्लीत होते. यामुळे त्यांनी चौकशीसाठी ईडीकडून वेळ मागून घेतला होता. यानंतर म्हणजेच 20 जुलै रोजी सकाळी 6.34 रोजी हे ट्विट केले होते. यानंतर आता संजय राऊतांवर कारवाई झाली आहे.

Sanjay Raut In ED Custody:  अब संजय राऊत की बारी है... 20 जुलै रोजी किरीट सोमय्यांचे ट्विट; 11 व्या दिवशी म्हणजे 31 जुलैला संजय राऊत ED च्या ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:00 PM

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांवर ईडीची कारवाई झालेय. रविवारी सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतले(Sanjay Raut In ED Custody). संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेय. यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यात भाजप नेते किरीट सोमय्यांची(Kirit Somaiya) प्रतिक्रिया लक्षवेधी ठरलेय. संजय राऊत को हिसाब तो देना पड़ेगा असे ट्विट करत किरीट सोमय्यांनी केले आहे. मात्र, याधीच म्हणजे 20 जुलै रोजी किरीट सोमय्यांचे ट्विट केले होते. अब संजय राऊत की बारी है… असं त्यांनी या ट्विट मध्ये म्हंटले होते. यानंतर बरोबर 11 व्या दिवशी म्हणजे 31 जुलैला संजय राऊत यांना ED ने ताब्यात घेतले आहे.

गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी (Goregaon Patrachal Land Scam) किरीट सोमय्या यांनी पाठ पुरावा केला होता. यानंतर ईडीने सोमय्या यांना चौकशीसाठी बोलावले होते. तसे समन्सही ईडीने राऊतांना बजावले होते. मात्र, पावसाळी अधिवेशनासाठी राऊत दिल्लीत होते. यामुळे त्यांनी चौकशीसाठी ईडीकडून वेळ मागून घेतला होता. यानंतर म्हणजेच 20 जुलै रोजी सकाळी 6.34 रोजी हे ट्विट केले होते. यानंतर आता संजय राऊतांवर कारवाई झाली आहे.

31 जुलैला सकाळी सात-साडे सातच्या सुमारासच ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतल्यावर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे नंतर आता घोटाळेबाज राऊत ईडीच्या ताब्यात आला आहे. संजय राऊत कोठडीत नवाब मलिकांचा शेजारी होणार. या सर्वाचा हिशेब द्यावाच लागणार असे ट्विट सोमय्यांनी केला आहे.

स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकीत किरीट सोमय्यांचा उल्लेख

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील महत्वाच्या दुवा असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी दोन दिवसांपूर्वी एक आरोप करत खळबळ उडवून दिली होती. संजय राऊतांविरोधात साक्ष दिल्याने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकीच्या चिठ्ठीत माझेही नाव असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. किरीट सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबतचं पत्र लिहिले होते. पाटकर यांना आलेल्या धमकीच्या चिठ्ठीत आपलंही नाव असल्याचं सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सांगीतले होते. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली होती.

Non Stop LIVE Update
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.