कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, 3 जूनपासून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा सुरु, कोल्हापूर-मुंबई कधी?

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अहमदाबाद बाबत माहिती देत असतानाच कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुद्धा लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असेही सांगितले. तसेच त्यांनी याबाबत आपले प्रयत्न सुरु असल्याचेही सांगितले.

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, 3 जूनपासून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा सुरु, कोल्हापूर-मुंबई कधी?
इंडिगो Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 8:17 PM

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर विमानसेवेवर (Kolhapur Airlines) परिणाम झाला होता. ज्यामुळे कोल्हापूरमधून होणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि पुन्हा विमानांची ये-जा सुरू झाली. मात्र गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा (Kolhapur-Ahmedabad-Kolhapur Airlines) ही बंद होती. ज्यामुळे गुजरातला जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांना रेल्वे सेवा आणि इतर वाहतुक साधणांवर अवलंबून राहावे लागतं होतं. मात्र आता प्रवाशांनी चिंता मिटली असून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू होणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (District Guardian Minister Satej Patil) यांनी सांगितलं आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली. तर ही सेवा इंडिगो कंपनीमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला नव्हता. येथे विमानतळ असूनही विमान मात्र उतरत नव्हतं. त्यामुळे अनेक चर्चा आणि प्रयत्नानंतर ते पुन्हा सुरू झाले आहे. तर येथून कोल्हार तिरूपती, अहमदाबाद, मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली होती. ज्यामुळे कोल्हापूरच्या विकासाची चाके गतिमान झाली होती. मात्र कोरोनाआला आणि ही चाके थांबली ज्यात कोल्हापूरमधून होणारी उड्डाणेही थांबली. तर कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा ही अहमदाबाद येथील धावपट्टीच्या कामामुळे बंद झाली होती.

अहमदाबाद येथील धावपट्टी

अहमदाबाद येथील धावपट्टीचे काम दिवसा सुरू राहत असल्याने येथील विमानांची सख्यां कमी करण्यात आली होती. तर येथे रात्रीची विमाने उतरण्यासाठीच मंजूरी देण्यात आली होती. तर कोल्हापूरमधून नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्यानेही विमानसेवा बंद होती. दरम्यान अहमदाबाद येथील धावपट्टीचे काम सहा महिन्यानंतर पुर्ण झाल्याने आता विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा

तर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अहमदाबाद बाबत माहिती देत असतानाच कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुद्धा लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असेही सांगितले. तसेच त्यांनी याबाबत आपले प्रयत्न सुरु असल्याचेही सांगितले.

03 जून पासून विमानसेवा सुरु

येत्या शुक्रवार दि. 03 जून पासून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. दर सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी ही विमानसेवा उपलब्ध असेल. या सेवेचे बुकिंग सुरु झाले आहे.

गेल्यावर्षी सुरू झाली होती विमानसेवा

गेली काही वर्षे चर्चेत असलेली अहमदाबादची विमानसेवा 22 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली होती. तर कोरोनामुळे बंद असलेली तिरुपती कोल्हापूर ही विमानसेवाही 20 किंवा 25 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ही सेवा इंडिगो एअरलाईन्सच्या माध्यमातून आठवड्यात तीन दिवस सेवा देण्यात येत होती. अहमदाबादहून सकाळी आठ वाजता सुटलेले विमान सकाळी सव्वादहा वाजता कोल्हापूरला पोहोचेल. पावणे अकरा वाजता कोल्हापुरातून अहमदाबादसाठी उड्डाण होईल, ते एक वाजता पोहचेल. पहिल्या टप्प्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस सेवा सुरू राहणार आहे. बुकिंगचे एस. एम. एस. आणि लिंक उद्योजक, उद्योगपती आणि अहमदाबाद प्रवास करणाऱ्या नागरिकांना पोहोचल्या आहेत.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....