Kolhapur Election Results 2026 LIVE : सोन्या मारुती कुणाला पावणार ? प्रभाग 11 आणि 12 च्या फैसल्याचं काऊंटडाऊन सुरू

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग 11 आणि 12 च्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर 'सोन्या मारुती' कोणाला पावणार, हे आज स्पष्ट होईल. दोन्ही प्रभागांमध्ये चुरशीची लढत झाली असून, कोण महापालिकेत जाणार आणि कोणाला घरी बसावे लागणार, याचा फैसला काही वेळातच होईल.

Kolhapur Election Results 2026 LIVE : सोन्या मारुती कुणाला पावणार ? प्रभाग 11 आणि 12 च्या फैसल्याचं काऊंटडाऊन सुरू
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:15 AM

कोल्हापुरात गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराचं नुसतं रण माजलं होतं. सर्वत्र इलेक्शन फिवर दिसून येत होता. निवडून येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला होता. बैठका, मेळावे, सभा, डोअर टू डोअर भेट आणि कॉर्नर मिटिंगांनी संपूर्ण 15 दिवस भारावून गेले होते. प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्येही प्रचाराचा ज्वर आकाशाला जाऊन पोहोचला होता. दोन्ही मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असल्याने यंदा कांटे की टक्कर होत आहे. आज या दोन्ही प्रभागातील उमेदवारांचा फैसला होणार आहे. महापालिकेत कोण जाणार आणि घरात कोण बसणार हे आजच ठरणार आहे. सोन्या मारूती नेमका कुणाला पावणार हे आज काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

प्रभाग 11 –

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग 11 मध्ये एकूण 27 हजार 626 मतदार आहेत. यात अनुसूचित जातीचे 4 हजार 103 तर अनुसूचित जमातीचे 55 मतदार आहे. हा प्रभाग अहिल्याबाई होळकर नगरपासून ते संभाजी नगरपर्यंत पसरलेला आहे. हा प्रभाग उत्तरेला सिद्धाळा गार्डनपासून सुरू होतो तो महादेव मंदिरापर्यंत जातो. पूर्वेला रावणेश्वर मंदिरापासून सुरू झालेला हा मतदारसंघ रिंग रोडला संपतो. दक्षिणेला हॉकी स्टेडियम सुरू होतं ते इंदिरा सागर हॉलपर्यंत संपतो. या मतदारसंघातील पश्चिमेचा भाग हा झोपडपट्टीचा आहे. इंदिरा सागर चौकापासून ते नेहरु बालोद्यानपर्यंत हा मतदार संघ आहे. या मतदारसंघात झोपडपट्टी, व्यापारी वर्ग आणि मार्केट परिसर अधिक येतो.

यंदा मतदारसंघ मोठा झाला आहे. 27 हजार मतदार झाले आहेत. तसेच पूर्वी एक नगरसेवक निवडून देता येत होतो. आता चार नगरसेवक निवडून देता येणार आहे. चार नगरसेवक निवडून देण्याची पद्धत चुकीची आहे, असं स्थानिकांचं म्हणणं होतं. पण शेवटी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतच या मतदारांनी मतदान केलं. आज या वॉर्डाचा निकाल येणार आहे. कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग 12 –

प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण 26 हजार 529 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 891 तर अनुसूचित जमातीचे 56 मतदार आहेत. या मतदारसंघाची व्याप्ती टाऊन हॉल ते दैवेज्ञ बोर्डिंग हॉल परिसरापर्यंतची आहे. उत्तरेला सोन्या मारुतीपासून सुरू होणारा हा मतदारसंघ टायटन शोरुमला संपतो. पूर्वेला टायटन शोरुमपासून सुरू होऊन तो मंडलिक गल्लीपर्यंत जातो. दक्षिणेला मंडलिक गल्लीपासून ते सिद्धाळा गार्डन आणि पश्चिमेला सिद्धाळा गार्डन ते सोन्या मारुती चौकापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे.

गेले 15 दिवस प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचाराचा नुसता धुरळा उडाला होता. सर्वच उमेदवारांनी प्रचाराचं रान उठवलं होतं. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे. या निवडणुकीत कुणाच्या पारड्यात विजय जातो हे आज दिसून येणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कोल्हापूर महानगरपालिका महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE