AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूरमध्ये वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलनImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 14, 2022 | 4:41 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं (Mahavitran) शेतकऱ्यांना (Farmers) कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा, बीड, वाशी गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.

चार गावातील ग्रामस्थ आक्रमक

महावितरणनं कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ झाले होते. कोणतिही पूर्वसूचना न देता वीज कापल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. महे, कसबा, बीड आणि वाशी गावातील ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरलं.

कोल्हापूरमधील काही भागात वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.  वीज कनेक्शन तोडायचं म्हणलं तर रितसर नोटीस द्यावी लागते. मात्र, सध्या महावितरणकडून सुरु असलेला प्रकार चुकीचा असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात खडाजंगी

गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

इतर बातम्या: 

बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

Kolhapur farmers reach to Mahadiscom office due to cut electricity without any information

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल