दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी आज जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला.

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?
जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात आंदोलनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:12 PM

जालनाः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी या सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाल्याचं सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका केली होती. दाववेंच्या या वक्तव्याचा नाभिक समाजाने तीव्र निषेध केला असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची (Nabhik Samaj) माफी मागावी, अशी भूमिका नाभिक समाजाने घेतली आहे. आज जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच त्यांचीही अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहन नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे यांनी केले.

कुठे, कधी केलं होतं आक्षेपार्ह विधान?

नाभिक समाजाला अपमानास्पद वाटेल, असं वक्तव्य करणं रावसाहेब दानवे यांना चांगलंच भोवणार असं दिसतंय. जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात दानवे यांनी तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरु असल्याचं म्हटलं. हे बोलतानाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती. ते म्हणाले होते, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे. विकासकामांना तुटपुंजा निधी देत महाविकास आघाडी सरकारनं लटकत ठेवलं आहे, असं दानवे म्हणाले होते. दानवेंच्या याच वक्तव्यामुळे नाभिक समाज आक्रमक झाला आहे.

काय म्हणतात नाभिक समाजाचे नेते?

नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी आज जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला. जालन्यातील मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. तसेच दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्या-

नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण

IPL 2022: नरिमन पॉईंट ते अंधेरी, मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये IPLची कुठली टीम उतरणार, काय सुविधा मिळणार?

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.