VIDEO: समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देत आहात तर अर्धी रक्कम द्या; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजित पवार-शरद पवारांना नाशिकपासून ते पुण्यापर्यंतचा रेल्वे मार्ग हवा आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी दोन्ही सरकारचा 50-50 टक्क्यांचा शेअरिंग हवा. या कामासाठी राज्य सरकार 70 टक्के शेअर देत आहे तर समृद्धी महामार्गाला का देत नाही?, असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

VIDEO: समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देत आहात तर अर्धी रक्कम द्या; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देत आहात तर अर्धी रक्कम द्या; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 1:41 PM

जालना: अजित पवार-शरद पवारांना नाशिकपासून ते पुण्यापर्यंतचा रेल्वे मार्ग हवा आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी दोन्ही सरकारचा 50-50 टक्क्यांचा शेअरिंग हवा. या कामासाठी राज्य सरकार 70 टक्के शेअर देत आहे तर समृद्धी महामार्गाला का देत नाही?, असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. समृद्धी महामार्गाचं नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं ठेवलं आहे. ठेवणारच आता. आम्ही या मार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. गोष्ट चांगली आहे. माझी उद्धव साहेबांची भेट झाली. त्यावेळी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 टक्के पैसे तुम्ही द्या, 50 टक्के पैसे आम्ही देतो. मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचा रस्ता आपण करू, असं मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. तसेच समृद्धी महामार्ग झाल्यावर तुमचं-आमचं सर्वांचं नाव घेतल्याशिवया राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जालन्यात एका सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवे बोलत होते. अनेकांची रेल्वेबाबतची अनेक स्वप्नं आहेत. औरंगाबादपासून पुण्यापर्यंत रेल्वे मार्ग झाला पाहिजे. नगरपर्यंत झाला पाहिजे. चाळीसगावपर्यंत झाला पाहिजे. हे सर्वे रेल्वेने केले नाही. महाराष्ट्राच्या महारेलने केलेले आहेत. त्यांच्याशी बैठक झाली तर आपण राज्य सरकारला आग्रह धरू. आम्हाला कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे टक्के 50 पैसे द्या अशी मागणी सरकारकडून करू. त्यानंतर रेल्वेचा मार्ग कुठून कसा असेल याचं प्राधान्य ठरवा. थांबा कुठून कुठपर्यंत करायचा हेही ठरवा, असं दानवे म्हणाले.

मी काही तरी देणं लागतो ना

मी देशात काम जरी करत असलो तरी मराठवाड्यावरचं माझ लक्ष कमी होणार नाही. पाच वेळा मला लोकांनी निवडून दिलं. गावात गेलो नाही, तरी मला निवडून दिलं. मग मी काहीतरी देणं लागतो ना. जालन्यापासून जळगाव पासून रेल्वे करणार आहोत. या प्रकल्पाला उशिर करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्याकडे बॉलिंगचं काम

सध्या रेल्वे बाबत अनेक मागण्या येत आहेत पण मी पण याच मागण्या अनेक वर्षे करत होतो. कैलास गोरंटयाल सध्या बॅटिंग करतात पण माझ्याकडे बॉलिंगचं काम आहे. रेल्वेच्या बाबतीत माझा देसाई व्हायची वेळ आली, असं सांगत रावसाहेब दानवे यांनी सांगितला सहकार मंत्री असतानाचा देसाई यांचा किस्सा सांगितला.

संबंधित बातम्या:

केंद्रीय तपास यंत्रणेकरवी थेट कारवाई करता, मग इथे पोलिसांनी साधी माहितीही घ्यायची नाही का, भुजबळांचा सवाल

एका व्हिडीओ बॉम्बने सर्व चिडीचूप, फडणवीसांचा दुसरा बॉम्ब येतोय; चंद्रकांतदादांचा दावा

आंदोलन करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न, माणिकराव ठाकरे यांची भाजपवर टीका

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.