समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे, दोनदा फडणवीसांच्या…; हसन मुश्रीफांची घणाघाती टीका

Hasan Mushrif on Samarjeet Ghatge : हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर घणाघात केला आहे. समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे आहे. त्यांनी दोनदा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे. मुश्रीफांचं वक्तव्य काय? वाचा सविस्तर...

समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे, दोनदा फडणवीसांच्या...; हसन मुश्रीफांची घणाघाती टीका
समरजीत घाटगे, हसन मुश्रीफImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 1:20 PM

कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समजित घाटगे यांच्यात लढत होणार आहे. आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुश्रीफांनी समरजित घाटगेंवर निशाणा साधला आहे. आजपर्यंत त्यांनी इतका फायदा भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा घेतला. मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले. समरजित घाटगे यांनी दोनदा खंजीर खुपसलं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांच्याबाबत आदर आहे पण एका गोष्टीची सल मनात कायम असल्याचं मुश्रीफांनी सांगितलं आहे.

घाटगेंबद्दल काय म्हणाले?

मी 35 वर्ष शरद पवारसाहेबांसोबत राहिलो. या काळात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुरुदक्षिणा दिली. मात्र समरजीत घाटगे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली. फडणवीस यांनी मला सांगितलं की समरजीत घाटगे हे आठवड्याला 25 ते 30 पत्र बदल्या. निधीची आणत होते. मात्र मला नंतर कळालं की यात किती घोळ झालेला आहे. हे ऐकून मला धक्का बसला असं फडणवीस मला म्हणाले असल्याचं मुश्रीफांनी सांगितलं.

कागल मतदारसंघातून पाच वेळा मी निवडून आलेलो आहे. परमेश्वराच्या कृपेने 25 वर्ष मला मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली. मूलभूत सोयी सुविधायक हा मतदारसंघ मी फार पुढे नेला आहे. कारच्या सगळ्या योजना मी झोपडी पर्यंत आणि चुलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजनांमधील त्रुटी दूर करू शकलो आहे. तालुक्यातील गटातटाचे राजकारण मी संपवलं आहे, असं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.

शरद पवारांबाबत काय म्हणाले?

1978 पासून शरद पवार यांचं काम करत आहे. इतक्या वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात अनेक स्थित्यांतरं आली. या काळात सुख दुःखामध्ये छोटा कार्यकर्ता म्हणून मी साहेबांसोबत राहिलो आहे. आता हा जो निर्णय घेतला आहे. तो देखील साहेबांना भेटून सांगितला होता. आतापर्यंत मी खारीच्या वाट्याप्रमाणे गुरुदक्षिणा शरद पवार यांना दिली आहे. शरद पवार हे माझे दैवत होते, आहेत आणि राहतील. पण माझ्यावर ही परिस्थिती ज्यांनी आणली. त्यांना घेऊन शरद पवारसाहेब फिरत आहेत. यावर मला आक्षेप आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी मनातील सल बोलून दाखवली आहे.

'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.