अशोक चव्हाणांसोबत जाणाऱ्या आमदारांच्या कथित यादीतील नेत्याची पहिली प्रतिक्रिया; माझ्या राजीनाम्याच्या बातम्या…

| Updated on: Feb 13, 2024 | 11:39 AM

Kunal Patail on Ashok Chavan will join BJP today : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार, नेते आणि पदाधिकारी जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रेस आमदाराने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाणांसोबत जाणाऱ्या आमदारांच्या कथित यादीतील नेत्याची पहिली प्रतिक्रिया; माझ्या राजीनाम्याच्या बातम्या...
Follow us on

भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 13 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण हे महाराष्ट्र्च्या राजकारणात ‘वजन’ असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच यादीत धुळ्यातील आमदार कुणाल पाटील यांचंही नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपली पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते भाजपसोबत जाणार आहेत की नाही? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कायम काँग्रेसमध्येच- पाटील

पक्ष हा एक विचार असतो. अशी परिस्थिती येते, तेव्हा पक्षात नवीन नेतृत्व तयार होतं. राज्यात सरकार नसतं. तेव्हा कामात अडचणी येतात ही वस्तुस्थिती आहे. सत्तेत नसला की पक्षाकडे तुम्हाला द्यायला ताकत नसते. अशावेळी आपण पक्षासोबत राहायचं असतं. मी तिसऱ्या पिढीचा काँग्रेसची आहे. मी कायम काँग्रेसमध्येच राहणार आहे, असं कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राजीनाम्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण

कालपासून मला विचारणा होतेय. पण माझ्या राजीनामाच्या बातमीत कोणताही तथ्य नाही. पक्षाचा कोणीही आमदार राजीनामा देणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही. अशोकराव चव्हाण यांचे वलय आहे. त्यांच्या विचारांचे कोणीतरी राजीनामे दिले असतील. जे पक्षाच्या विचारांशी जोडलेले आहे.त ते काँग्रेस सोडतील असं वाटत नाही, असं कुणाल पाटील म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याच्या बातम्यांवर कुणाल पाटलांची प्रतिक्रिया

राजकारणात गेल्या पाच वर्षात इतकी स्थित्यांतरं बघितली आहेत की, आता धक्का बसणं बंद झालंय. जे होईल त्यातून मार्ग काढायचा अशी आमची मानसिकता आता झाली आहे. काल वाटतं कोणीतरी पान टपरीवर बसून आमदारांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सहकाऱ्यांशी बोललो. त्यांनी आपली भूमिका मांडली. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. असंच त्यांनी सांगितलं असल्याचं कुणाल पाटील म्हणाले.