भाजप प्रवेशाआधी अशोक चव्हाण यांची पहिल्यांदाच काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका

Ashok Chavan will join BJP today he Criticized Congress and Nana Patole : काँग्रेसला रामराम करत अशोक चव्हाण यांनी नवा रस्ता निवडला आहे. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पक्षप्रवेशाआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. वाचा सविस्तर...

भाजप प्रवेशाआधी अशोक चव्हाण यांची पहिल्यांदाच काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका
Mumbai Ashok Chavan will join BJP today he Criticized Congress Nana Patole Latest Marathi News
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 7:45 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. सगळा मनमानी कारभार सुरू होता, असं अशोक चव्हाण म्हणाले. निवडणुकांच्या अनुषंगानेही अशोक चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये तयारी नव्हती. काँग्रेसमध्ये कोणतेही बदल दिसत नव्हते. कितीकाळ स्वत:ची कोंडी होऊ द्यायची, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

चव्हाण यांच्या मनातील खदखद

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशाच ही आगामी लोकसभा निवडणूक कशी जिंकायची याची तयारी नव्हती. त्यामुळे ही निवडणूक कशी जिंकायची याची माझ्यासोबतच अनेकांना प्रश्न होता. सध्याची देशातील परिस्थिती पाहता आंदोलन करण्याची ही वेळ होती. असं असताना काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू होतं. या सर्व कार्यपद्धतीबाबत मी सूचना केल्या. पण त्याची दखल घेतली जात नव्हती. पक्षात टीमवर्क कुठेही दिसत नव्हतं. शेवटी किती वाट पाहायची? काँग्रेस पक्षात चांगले बदल दिसत नव्हते. स्वत:ची किती कोंडी होऊ द्यायची?, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

काँग्रेसला सोडचिठ्ठी, आज भाजत प्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 12 फेब्रुवारीपासून आपण काँग्रेसचं सदस्यत्व सोडत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसला रामराम केल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर भाजपची पत्रकार परिषद होणार आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.